दसरा मेळाव्याची तयारी सुरू…

शिवसेना करणार शक्‍तीप्रदर्शन : 5 लाख कार्यकर्ते शिवाजी पार्कवर बोलवा

मुंबई – आगामी लोकसभा आणि त्या पाठोपाठ होणा-या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना जोरदार तयारी करत असून दसरा मेळाव्यातून शक्‍तीप्रदर्शन करण्याचा निर्धार केला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा असेल, तर दसरा मेळाव्यात ताकद दिसली पाहिजे. त्यामुळे पाच लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर बोलवा, असे आदेश शिवसेना नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवसेनेने गणेशोत्सवानंतर आता दसरा मेळाव्याची तयारी सुरु केली आहे. दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी शिवसेनेने आज शिवसेना भवनात बैठक बोलावली होती. या बैठकीला खासदार संजय राऊत, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर आणि रघुनाथ कुचिक उपस्थित होते.

या बैठकीला ठाणे, पुणे, कल्याण, नाशिक पालघर, रायगड, मावळ, उरण, भिवंडी मतदारसंघातून कार्यकर्ते आले होते. शिवतीर्थावर शिवसेना शक्तीप्रदर्शन करणार आहे. निवडणुकीआधी दसरा मेळावा जोरदार करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. पाच लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते शिवाजी पार्कवर बोलवा, असे आदेश यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आले.

देशाचा पंतप्रधान निवडायची जर वेळ आली तर शिवसेनेची भूमिका महत्वाची असेल. भाजपला प्रत्येक शिवसैनिकाने ताकद दाखवण्यासाठी दसरा मेळावा हे योग्य व्यासपीठ आहे. भाजपला शिवसेनेची ताकद शिवतीर्थावर दिसली पाहिजे, असेही या बैठकीत ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)