यू-ट्यूबवर ४३ लाख लोकांनी पहिला ‘या’ चित्रपटाचा टीझर

नवी दिल्ली: अभिनेता अनिल कपूर आणि आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या आगामी ‘फन्ने खान’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रसिद्ध झाला. या टीझरने यू-ट्यूबवर धुमाकूळ घातला असून हा टीझर आतापर्यंत ४३ लाख पेक्षा जास्त प्रेक्षकांनी पहिला आहे. तर ५१ हजार लोकांनी या टीझरला लाईक केले आहे.

‘फन्ने खान’ या चित्रपटाच्या टीझर मध्ये अनिल कपूर, ऐश्वर्या राय बच्चन आणि राज कुमार राव दिसत आहेत. अतुल मांजरेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. गुलशन कुमार टी-सीरीज आणि आरओएमपी फिल्म्स प्रस्तुत हा चित्रपट ३ ऑगस्ट ला प्रदर्शित होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://youtu.be/A_ieXzbZm_w

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)