43 हजार भटक्‍या श्‍वानांची नसबंदी

पिंपरी – भटक्‍या श्‍वानांचा उपद्रव व त्यांच्यामुळे पसरणारे आजार यामुळे नगरसेवकांनी महापालिकेच्या पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. कारवाईची आकडेवारी सादर करा अन्यथा त्यांचे निलंबन करा, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत कऱण्यात आली. या इशाऱ्यानंतर अधिकाऱ्यांनी अखेर नसबंदी केलेल्या श्‍वानांची आकडेवारी जाहीर केली. यामध्ये प्रशासनाच्या दाव्यानुसार 2015 ते 2018 या तीन वर्षात एकूण 43 हजार 296 श्‍वानांची नसबंदी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

परिसरात भटक्‍या प्राण्यांचा वावर वाढत असून त्यांच्यामुळे अस्वच्छता वाढत आहे. डुकरांचा उपद्रव वाढल्याने स्वाईन फ्लूसारखे आजार बळावत असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली होती. यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी काहीच कारवाई करीत नाहीत, असा आरोप करण्यात आला होता. याची माहिती पशु वेैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांच्याकडे मागितली असता त्यांना ती देता आली नाही. त्यामुळे नगरसेवकांनी डॉ. दगडे यांच्या निलबंनाची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत केली होती. त्यानंतर झालेल्या बैठकीत डॉ. दगडे यांनी आकडेवारी मांडण्याची तत्परता दाखवली. त्यानुसार 2015 ते 2016 या वर्षात 15 हजार 808 श्‍वानांची नसबंदी करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2016- 17 मध्ये 12 हजार 581 व 2017-18 सालात 14 हजार 907 अशा 43 हजार 296 श्‍वानांवर नसबंदीची शस्त्रक्रीया करण्यात आली. यासाठी 2015 ते 2016 या वर्षात 1 कोटी 9 लाख 55 हजार 523 रुपये, 2016-17 मध्ये 87 लाख 19 हजार 315 रुपये तर 2017 ते चालु वर्षात आज अखेरपर्यंत 1 कोटी 3 लाख 30 हजार 916 रुपये खर्च करण्यात आला आहे. एका श्‍वानाच्या नसबंदीसाठी एकूण 693 रुपयांचा खर्च येतो. तर 2017 ते 2018 या चालु वर्षात 1 हजार 578 डुकरांवर शस्त्रक्रीया केल्याची नोंद पशु वैद्यकीय विभागाकडे आहे. मात्र तरीही शहरात भटक्‍या कुत्र्यांची व डुकरांची संख्या वाढत कशी आहे, अशी तक्रार नगरसेवकांनी यावेळी केली.

श्‍वानांच्या गळ्यात घालणार बेल्ट
किती श्‍वानांवर, कधी शस्त्रक्रिया केली याची माहिती रहावी यासाठी आता श्‍वानांच्या गळ्यात रंगीत बेल्ट घातले जाणार आहेत. वर्षानुसार हा रंग ठरलेला असेल. त्यामुळे कोणत्या वर्षी शस्त्रक्रिया झाली हे देखील लक्षात येईल, अशी उपाययोजना स्थायी समिती समोर मांडण्यात आली. मात्र या बेल्टसाठी पुन्हा कोट्यावधीचा खर्च महापालिका करणार का, तसेच हा बेल्ट कोणी तोडला किंवा काही कारणामुळे तुटला तर त्याची नोंद कशी होणार, त्यासाठी पर्यायी उपाययोजना काय, असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)