२१ वर्षीय मुलीच्या चेहऱ्यावर टाकले रासायनीक पदार्थ

मध्यप्रदेश मधील इंदोरमध्ये २१ वर्षीय मुलीवर रासायनीक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. इंदोरमध्ये एका अज्ञात व्यक्तीने दिवसा २१ वर्षीय मुलीच्या चेहऱ्यावर रासायनीक पदार्थ टाकले. त्यानंतर तिला लगेच इस्पितळात हलवण्यात आले. तिच्या चेहऱ्याला काही हानी पोहचलेली नाही. परंतु, डोळ्यात रासायनीक पदार्थ गेल्याने तिला पाहण्यात थोडा त्रास होत आहे.

ही सर्व घटना तेथील सिसिटीव्ही कॅमेरात कैद झाली असून पीडित मुलगी एका प्रसिद्ध रियॅलिटी डान्स शोमध्ये सहभागी झालेली होती. काही वेळामध्येच ती एका डान्स शोसाठी अमेरिकेला रवाना होणार होती. आरोपीला पोलिसांनी पकडलेले आहे.

-Ads-

सीसीटीव्हीमधील फुटेजमध्ये दिसून येते की, मुलगी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून तेथे उभी होती. तेव्हा तो आरोपी तेथे येतो आणि तिच्या चेहऱ्यावर रासायनिक पदार्थ टाकतो आणि पळून जातो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)