जेजुरी- पुणे जिल्हा क्रीडा परिषद, पुरंदर तालुका क्रीडा संघटना आणि शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल सासवड यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय कब्बडी स्पर्धेत चौदा वर्षाखालील गटात कोथळे येथील विद्या महामंडळ प्रशालेच्या मुले आणि मुलींनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
सासवड येथील शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या कबड्डी स्पर्धेत तालुक्‍यातील बत्तीस संघ सहभागी झाले होते. कोथळे विद्यालयातील सुरज काकडे, युवराज राठोड, लक्ष्मण निंबाळकर, समीर राठोड, शान राठोड, राहुल पवार, मयूर राठोड, मुबारक खान, प्रथमेश भोसले, कुणाल जगताप, सूरज पवार आणि संकेत कुदळे या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी करत प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकाविला.
तसेच मुलींच्या कबड्डी स्पर्धेत तालुक्‍यातील 28 संघ सहभागी झाले होते. कोथळे विद्यालयातील समृद्धी जगताप, साक्षी कापरे, मानसी काळाने, निकिता गायकवाड, तनिष्का भोसले, सविता महानवर, वैष्णवी भोसले, श्रावणी जगताप, अपेक्षा भोईटे, पूनम भंडलकर, सिध्दी जगताप, अनुष्का काकडे या मुलींनी उत्कृष्ट खेळी करून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच जवळार्जुन येथे झालेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत 17 वयोगटात कोथळे विद्यालयातील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. मुख्याध्यापक एच. डी. दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक किशोर भालेराव, काशिनाथ भोंग, नितीन राउत, प्रशिक्षक संदीप जगताप, चारुदत्त काळाने आदींनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)