पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा मोठा धोका

पळसदेव- पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर ते भिगवण दरम्यान अनेक ठिकाणी अवैधरित्या महामार्गाचे कठडे तोडून महामार्ग ओलांडण्यासाठी रस्ता तयार केल्याने अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठी गावे कंपन्या, एमआयडीसीसाठी महामार्गावर दुतर्फा बाजूला जाण्यासाठी सोय केली आहे .मात्र, इंदापूर ते भिगवण दरम्यान अनेक ठिकाणी ढाबा, पेट्रोल पंपचालक तसेच छोट्या छोट्या वस्त्यावर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी रास्ता ओलांडण्यासाठी किंवा गुरे रस्त्याच्या एका बाजुवरून दुसऱ्या बाजूला नेण्यासाठी अवैधरित्या महामार्गाचे दुभाजकाचे कठडे तोडून रस्ता केला असल्याने अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
तोंडेवस्ती, लोणी देवकर, थोरातवस्ती, डाळज नं 3 परिसरात इंदापूर ते भिगवण मार्गावर सुमारे 17 ठिकाणी अशाचपद्धतीने अवैध प्रकारे रस्ता दुभाजक तोडला आहे. वस्ती नसलेल्या ठिकाणी वाहनांचा वेग अधिक असतो. अशातच गुरे घेऊन अथवा नागरिक दुचाकी घेऊन अचानक रस्त्यावर येतात त्यामुळे अनेकदा अपघात झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्ता दुभाजकावर उगवलेले गावात चारण्यासाठी काही नागरिक दुभाजक जवळच गुरे बांधत असल्याने मुक्‍या प्राण्यांचा जीवही धोक्‍यात आला आहे. तरी अवैधरित्या रस्ता दुभाजक तोडून केलेले रस्ते बंद करून भविष्यात होणारे अपघात टाळावे, अशी मागणी प्रवशांमधून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)