मृत्यूच्या दाढेतील प्राजक्ताला हवी समाजाच्या दातृत्वाची गरज

फलटण, दि. 8 (प्रतिनिधी) – दोन्ही किडण्या निकामी झाल्याने फडतरवाडी, ता. फलटण येथील कु. प्राजक्ता हणमंत फडतरे ही मुलगी मृत्यूच्या दारात आहे. दहावीत 91 टक्के मार्क्‍स मिळवणाऱ्या या गरीब घरातील गुणी मुलीला वाचवण्यासाठी समाजाच्या दातृत्वाची गरज आहे. यासाठी तिच्या शेतमजूर असलेल्या आई-वडिलांनी मदतीचे आवाहन केले आहे.
फडतरवाडी कु. प्राजक्ताचे आई-वडिल शेतमजूर आहेत. अभ्यासात हुषार असलेल्या प्राजक्‍ताने दहावीत 91 टक्के मार्क्‍स मिळवून आपली चुणूक दाखवली. परंतु, तिला असाध्य रोगाने गाठल्याने दोन्ही किडण्या निकामी झाल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालयात उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणारी प्राजक्ता आज मृत्यूचा सामना करत आहे. तिचे आयुष्य डायलिसीस मशीनवर अवलंबून आहे. मुलीला वाचण्यासाठी तिची आई किडणी देणार आहे. यासाठी कोईमतूर (तामिळनाडू) येथील कोवाई हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. यासाठी मोठा खर्च येणार आहे. यामुळे शेतमजूर असलेले कुटुंब हतबल झाले आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावे, असे आवाहन आई-वडिलांनी केले आहे. मदत करू इच्छणाऱ्या दानशूर व्यक्तींनी 9011001091 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
15 :thumbsup:
3 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
11 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)