कृतिका कामरा लवकरच मोठ्या पडद्यावर

छोट्या पडद्यावर “कितनी मोहोब्बत है’मध्ये आरोही आणि “कुछ तो लोग कहेंगे’ मध्ये निधी साकारणारी कृतिका कामरा आता लवकरच मोठ्या पडद्यावरही झळकणार आहे. “मित्रों’ हा तिचा पदार्पणाचा सिनेमा असणार आहे. गुजराती वातावरणातील “मित्रों’ हा “पेलीचुपूलू’ या तेलगू सिनेमाचा हिंदी रिमेक असणार आहे.

यापूर्वीही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी तिला मिळाली होती. मात्र, काही ना काही कारणाने ही संधी हुकली होती. तिला पहिल्यापासूनच बॉलिवूडचे आकर्षण टेलिव्हिजनपेक्षा जरा जास्तच होते. एक दोन वेळेस तिची निवडही झाली होती. अगदी सिनेमाचे शुटिंग सुरू होण्याची देखील तयारी झाली होती.

मात्र सिनेमा काही सुरू झाला नाही. त्यामुळे यावेळी सिनेमाची निवड करताना तिने खूप काळजी घेतली. चांगला डायरेक्‍टर, चांगली स्क्रीप्ट आणि प्रॉडक्‍शन हाऊसचा नावलौकीक आदी सर्वच गोष्टी पारखून मगच सिनेमा स्वीकारण्याचे धोरण तिने अवलंबले. “मित्रों’चे डायरेक्‍शन “फिल्मीस्तान’वाला नितीन कक्कड करणार आहे. शिवाय यामध्ये तिच्याबरोबर जॅकी भगनानीही असणार आहे. जोडीदार आणि नातेसंबंधांचा प्रमुख विषय असलेल्या या सिनेमामध्ये तीन अभिनेत्यांबरोबर कृतिका एकटी अभिनेत्री असणार आहे.

त्यामुळे तिला खूप स्कोपही असणार आहे. एरवी टीव्ही मालिकांमध्ये जेवढ्या नायिका असतात, तेवढ्याच सहनायिका आणि खलनायिकाही असतात. त्यामुळे रोल लिमिटेड होतो. तो धोका इथे नाही, असेही कृतिका म्हणाली. टीव्हीवरच्या मालिकांमध्ये नेहमी साचेबद्ध रोल करून कंटाळलेल्या कृतिकाला बॉलिवूडच्या पहिल्याच रोलमध्ये तिला सुशिक्षित आणि महत्त्वाकांक्षी महिलेचा रोल करायला मिळतो आहे, ही आणखीन आनंदाची गोष्ट आहे.

सिनेमाचे काम मिळाल्याने विशेष आनंदी असलेल्या कृतिकाने सध्या मालिकांमधील कामच थांबवून टाकले आहे. तिने आपले पूर्ण लक्ष आपल्या पदार्पणाच्या सिनेमावरच केंद्रित करून टाकले आहे. यातून मिळणाऱ्या यशावरच तिची पुढची कारकीर्द ठरणार आहे. सिनेमाचे शुटिंग संपले आहे आणि आता तिला प्रमोशनमध्ये सहभाग घ्यायचा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)