हॉरर आणि कॉमेडी यांचा जबरदस्त तडका असणारा श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा ‘स्त्री’ चित्रपट सध्या चांगलीच कमाई करत आहे.  बॉक्स ऑफिस इंडियाच्या आकडेवारीनुसार या चित्रपटाने मंगळवारी ५.७५ कोटी रुपयांची कमाई केली.

या चित्रपटाला सोमवारी असलेल्या जन्माष्टमीच्या सुट्टीचा फायदा झाला असून सोमवारी या चित्रपटाने ८.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. मागील ५ दिवसात या चित्रपटाने एकूण ४७ कोटी रुपयांची कमाई  केली आहे.

हा चित्रपट २० कोटी रुपये खर्च करून बनवला गेला असल्याचे वृत्त आहे. हा चित्रपट पुढील काही दिवसात जोरात  कमाई करेल अशी चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)