आजीमाजी आमदार, खासदारांवर 4122 फौजदारी खटले

नवी दिल्ली: देशातील आजी, माजी आमदार व खासदारांवर एकूण 4122 फौजदारी खटले प्रलंबीत आहेत अशी माहिती आज सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. आमदार आणि खासदारांवरील प्रलंबीत फौजदारी खटल्याच्या संबंधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीच्यावेळी सरकारकडून ही माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती. सर न्यायाधिश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही माहिती सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार ही माहिती आज कोर्टात सादर करण्यात आली.

आमदार आणि खासदारांवरील फौजदारी स्वरूपांच्या खटल्यांच्या त्वरीत सुनावणीसाठी स्वतंत्र कोर्टांची स्थापन करता येणे शक्‍य आहे काय या विषयावर सध्या ही सुनावणी सुरू आहे. आमदार आणि खासदारांवर जे खटले प्रलंबीत आहेत त्यात 1991 पासूनच्या खटल्यांचाही समावेश आहे. यातील अनेक प्रकरणांमध्ये अजून संबंधीतांवर आरोपनिश्‍चीतही करण्यात आलेली नाही. भाजपचे नेते अश्‍विनी उपाध्याय यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की ज्या लोकप्रतिनिधींवर फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यांतील खटल्यात शिक्षा झाली आहे त्यांना आयुष्यभर कोणत्याही निवडणुका लढवण्यावर बंदी घालण्यात यावी. तसेच लोकप्रतिनिधींवरील खटल्यांची सुनावणी वेगाने व्हावी यासाठी स्वतंत्र कोर्ट स्थापन केली जावीत अशी मागणीही त्यांनी या याचिकेत केली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)