वर्षभरातील बॅंक घोटाळ्यांमध्ये 41 हजार कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: 217-18 या आर्थिक वर्षात बॅंकांमध्ये झालेल्या घोटाळ्यांच्या प्रमाणात 72 टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून या वर्षात 41,167.7 कोटी रुपयांचा अपहार झाला आहे. गेल्यावर्षी बॅंक व्यवहारांमधून 23,933 कोटी रुपयांचा अपहार झाला होता, अशी माहिती रिझर्व बॅंकेच्या माध्यमातून देण्यात आली.

2017-18 या आर्थिक वर्षात देशभरात बॅंकांमधील गैरव्यवहारांची 5,917 प्रकरणे घडली. गेल्यावर्षी याच गैरव्यवहारांची संख्या 5,076 इतकी होती. बॅंकांमधील गैरव्यवहारांच्या प्रमाणामध्ये गेल्या चार वर्षांमध्ये वाढच झाली आहे. गेल्या चार वर्षात अशा गैरव्यवहारातील रकमेच्या आकड्यातही चौपट वाढ झाल्याचे “आरबीआय’ने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येते आहे. 2013-14 साली 10,170 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2017-18 च्या बॅंक गैरव्यवहारांमध्ये ताळेबंदातील फेरफार, विदेशी चलनाशी संबंधित व्यवहार, ठेवी खाती आणि सायबर व्यवहारच प्रामुख्याने होते. बॅंकांमध्ये अन्य गैरव्यवहारांपेक्षा सायबर गैरव्यवहारच अधिक झाले. यावर्षी झालेल्या 2,059 सायबर गैरव्यवहार झाले असून त्यातून यावर्षी 109.6 कोटी रुपयांचा अपहार झाला. गेल्यावर्षी झालेल्या 1,372 सायबर गैरव्यवहारांमधून 42.3 कोटींचा अपहार झाला होता.

या वर्षीच्या गैरव्यवहारांमध्ये 50 कोटी आणि त्यापेक्षा अधिक रकमेची प्रकरणे 80 टक्के आहेत. 1 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे 93 टक्के गैरव्यवहार सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये आणि खासगी बॅंकांमध्ये केवळ 6 टक्के घडले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)