भवानीनगर – जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा अंतर्गत खासदार गिरीश बापट व राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील विविध विकासकामांसाठी परिसरामध्ये एकूण 41 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तानाजी थोरात यांनी दिली. यावेळी थोरात यांनी मजूर झालेल्या कामाची सविस्तर माहिती दिली.
थोरात म्हणाले की, मानकरवाडी ते जांब रस्ता करणे 4 लाख रुपये, मानकरवाडी ते उद्धट रस्ता करणे 4 लाख रुपये, उदमाईवाडी अंतर्गत रस्ते 4 लाख रुपये, घोलपवस्ती ते उद्धट इंदलकरवस्ती रस्ता 4 लाख रुपये, मानकरवाडी अंतर्गत रस्ते 5 लाख रुपये उद्धट – पवारवाडी – कर्दनवाडी रस्ता 20 लाख रुपये आदी कामांना मंजुरी मिळाली आहे. परिसराच्या विकासासाठी तानाजी थोरात यांच्या माध्यमातून विविध विभागांना पाठपुरावा करून निधी आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. मंजूर झालेला निधी हा तालुक्याच्या एका भागातील आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये अशाच पद्धतीने निधीचा ओघ सुरू आहे. ग्रामीण भागाला विकासाचे केंद्रबिंदू मानून सरकार काम करीत आहे. सरकार ग्रामीण भागामध्ये विशेष लक्ष्य देत आहे. मंजूर झालेल्या कामांमुळे परिसरामध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे तानाजी थोरात यांनी सांगितले.