41 जणांना “आदर्श शिक्षक’ पुरस्कार

पिंपरी – मुळशी पंचायत समितीतर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी, तालुक्‍यातील 41 शिक्षकांना “आदर्श शिक्षक’ म्हणून गौरविण्यात आले.

गुणवंत शिक्षक पुरस्कारात हिंजवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चार शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती विवेक वळसे-पाटील, मुळशीच्या पंचायत समितीच्या सभापती कोमल साखरे, उपसभापती पांडुरंग ओझरकर, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, अंजली कांबळे, पंचायत समिती सदस्य राधिका कोंढरे, सुनील चांदेरे, महादेव कोंढरे, बाबा कंदारे, शांताराम इंगवले, सागर साखरे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, गट शिक्षण अधिकारी माणिक बांगर आदी उपस्थित होते.

वळसे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच, पुणे जिल्हा परिषदेने राज्यात शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. या पुरस्कारात हिंजवडी जिल्हा परिषद शाळेतील सुनीता साखरे, मंगला वगद, मंगल खेतमाळीस, दिलीप झोळ या चार शिक्षकांनी आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आले. तसेच, शाळेतील क्रीडा स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. संतोष गावडे व ज्योती दवणे यांनी सूत्रसंचालन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)