रस्त्यावर वस्तू विक्री करणाऱ्या सहा वर्षाच्या मुलाचा कारच्या धडकेत मृत्यू
पुणे,दि.7 -रस्त्यावर छोट्या -मोठ्या वस्तूंची विक्री करणाऱ्या सहा वर्षाच्या मुलाचा कारच्या धडकेत मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरुध्द बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवकुमार राधेशाम बागरी(6) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी राजेश्री बागरी यांनी फिर्याद दिली आहे.
राजेश्री बागरी यांचे कुटूंब रस्त्यावर छोटया-मोठ्या वस्तू विकून उदरनिर्वाह करते. त्यांचा सहा वर्षाचा मुलगा शिवकुमार हा आरटीओ येथील सिग्नल जवळ मोबाईल स्टॅंड व वायफर विकत होता. सिग्नल लाल झाल्यावर तो वाहनचालकांजवळ जाऊन वस्तू विकायला गेला होता. सिग्नल हिरवा झाल्यावर तो रस्त्याच्या कडेला जात होता. मात्र कारचालकाला तो न दिसल्याने कारची ठोकर त्याला बसली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला कार चालकाने रुग्णालयात दाखल झाले असता तो मृत झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ए.एस.ठोंबरे तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)