40,000 च्या टप्प्यावर पडणारे काही प्रश्‍न (भाग-1)

बहुचर्चित सेन्सेक्‍सची घोडदौड ही 40,000 च्या दिशेनं सुरूच आहे. अशावेळी आपल्या गुंतवणुकीच्या संदर्भातील निर्णय कसे घ्यावेत, असे प्रश्‍न पडतात. त्यांच्यासाठी…
पुस्तकस्था तु या विद्या परहस्तगतं धनम्‌ । कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद्‌ धनम्‌ ।।

आईच्या मुखाद्वारे माझ्या लहानपणापासून अगदी सकाळी अनेक सुभाषितं कानावर पडायची, त्यांतील हे एक! याचा अर्थ पुस्तकातील विद्या, दुसऱ्याच्या ताब्यात असलेली एखाद्या व्यक्तीची संपत्ती यांचा काहीही उपयोग नसतो. अगदी गरजेच्या वेळी सुद्धा यांतील काही एक मनुष्याच्या मदतीस येत नाही. याचाच अर्थ बाजार जरी कितीही वाढला तरी त्यामध्ये केलीली गुंतवणूक योग्य वेळी काढून घेणं, हे नेहमीच हितावह ठरू शकतं. याचा अर्थ पूर्ण गुंतवणूक काढून घेणं नव्हे. अतितष्णा न कर्तव्या तष्णां नैव परित्यजेत । बहुचर्चित सेन्सेक्‍सची घोडदौड ही 40,000 च्या दिशेनं सुरूच आहे व मागील आठवड्यात सेन्सेक्‍सनं 38,989.65 हा आतापर्यंतचा सर्वोच्च उच्चांक नोंदवला आहे. मागील वर्षी 31 ऑगस्टला सेन्सेक्‍स होता 31,730, म्हणजे एका वर्षात सुमारे 21.63 % वाढ. ज्या गुंतवणूकदारांनी सुज्ञपणे गुंतवणूक केली, त्यांना निश्‍चितच उत्तम परतावा मिळाला आहे. तसेच, वाढता

निर्देशांक हा अनेकांचे छातीचे ठोके देखील वाढवत असतो. अनेकांना धाकधूक असते ती म्हणजे बाजारातील करेक्‍शन बद्दल.आणि अप्रत्यक्षपणे कमी होणारी त्यांच्या पोर्टफोलिओची किंमत. या अनुषंगानं, अशा परिस्थितीत अनेक प्रश्‍न गुंतवणूकदारांना पडत असतात, त्याचा या लेखात आढावा घेऊ.

मार्केटमधील गुंतवणूक काढून घेऊन हातात रोकड ठेवावी का ?
बाजाराचा तळ व शिखर कोणालाच ओळखता येत नाही. त्यामुळं बाजारातील गुंतवणूक ही कोणत्या वेळी बाहेर काढावी हे ठरवणं अवघड आहे; परंतु बाजारातील गुंतवणूक ही दीर्घ मुदतीसाठीच केली असल्यानं ती गुंतवणूक बाहेर काढून हातात रोकड ठेवणं हे पटण्यासारखं नाहीय. एक तर हातात रोकड ठेवल्यानं ती इतरत्र खर्च होऊ शकते आणि अशा रोकडीवर कोणताच परतावा मिळत नाही. आतापर्यंतचा अभ्यास व आढावा सांगतो की, प्रत्येक परिस्थितीवर बाजारानं मातच केलेली आढळते.

बाजारातील हेलकाव्यांचा फायदा बाजारातील गुंतवणुकीबाबत करून घ्यावा का?
बाजारातील गुंतवणूक ही नेहमी दीर्घावधीसाठीच केलेली असावी. त्यामुळं बाजारातील छोट्या-मोठ्या हेलकाव्यांमध्ये फायदा साधण्याऐवजी ती गुंतवणूक तशीच राहू द्यावी. कारण एखादा शेअर खूप वाढला किंवा एखादा एखाद्या म्युच्युअल फंडच्या एखाद्या योजनेची एनएव्ही ही तिच्या अच्युत्तम भावावर असेल, तर त्यापेक्षा त्यात वाढ होणारच नाही हा आपला ग्रह असतो; परंतु येणाऱ्या दशकाचा विचार केल्यास, त्यापेक्षा बरीच वाढ होण्यास शक्‍यता असते व त्या वाढीस आपण मुकू शकतो. म्हणून जवळील छोट्या फायद्यापेक्षा दीर्घ मुदतीतील मोठ्या परताव्यावर लक्ष केंद्रित करणं केव्हाही हितावह.

40,000 च्या टप्प्यावर पडणारे काही प्रश्‍न (भाग-2)

बाजारात गुंतवणूक करणं बंद करावं का?
बाजाराच्या प्रत्येक हेलकाव्यात आपला सहभाग असावा व खरेदी किमतीची योग्य प्रकारे सरासरी बनावी (अॅव्हरेजिंग), ना की कमी किमतीत खरेदी. कारण बाजार हा दीर्घ मुदतीत कोठपर्यंत जाणार आहे; अथवा किती मजल गाठणार आहे, याचा आपण आत्ताच अंदाज लावू शकत नाही. म्हणून बाजारात चालू असलेली नियमित गुंतवणूक (SIP) बंद करणं हे कधीही फायदेशीर ठरू शकत नाही आणि जर एखाद्याचं गुंतवणूक उद्दिष्टच जर थोड्याच अवधीचं म्हणजे 3 वर्षांपेक्षाही कमी असेल तर त्यानं बाजारापासून लांब राहणं चांगलं. बरेच लोक बाजार खूप खाली आल्यास बाजारातील नियमित गुंतवणूक थांबवतात; परंतु असं करणं गुंतवणुकीच्या उद्दिष्टास मारक ठरू शकतं, कारण कमी भावातील होणारी खरेदी आपण एक प्रकारे थांबवत असतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)