निमलष्करी दलांचे 400 जवान मागील तीन वर्षांत शहीद 

नवी दिल्ली – पाकिस्तानी गोळीबार, दहशतवादी कारवाया, बंडखोरांनी घडवलेला हिंसाचार यांच्याशी संबंधित घटनांमध्ये मागील तीन वर्षांत निमलष्करी दलांचे सुमारे 400 जवान शहीद झाले. त्यामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांची संख्या सर्वांधिक आहे.

याबाबतची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. शहिदांची आकडेवारी 2015 ते 2017 या कालावधीतील आहे. त्या कालावधीत बीएसएफच्या 167 जवानांनी प्राणांची आहुती दिली. त्यातील बहुतांश जवान अतिसंवेदनशील भारत-पाकिस्तान सीमेचे रक्षण करताना कामी आले. जम्मू-काश्‍मीरात दहशतवाद्यांबरोबर आणि इतर राज्यांत नक्षलवाद्यांबरोबर लढताना केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) 103 जवान शहीद झाले.

तीन वर्षांत शहीद झालेल्या सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) जवानांची संख्या 48 इतकी आहे. त्या दलावर भारत-भूतान आणि भारत-नेपाळ सीमांच्या रक्षणाची जबाबदारी आहे. संबंधित कालावधीत भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे (आयटीबीपी) 40 पोलीस मृत्युमुखी पडले. तर आसाम रायफल्सचे 35 जवान मरण पावले. ते दल भारत-म्यानमार सीमेच्या रक्षणासाठी सज्ज आहे. त्या दलाच्या जवानांना ईशान्येतील बंडखोरांचा मुकाबला करावा लागतो. मागील तीन वर्षांत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) 2 जवान मृत्युमुखी पडले. विमानतळ, आण्विक केंद्रे, मेट्रो आणि इतर संवेदनशील ठिकाणांवर सीआयएसएफचे जवान तैनात केले जातात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)