तृणमूलचे ४० आमदार माझ्या संपर्कात – मोदींचा गौप्यस्फोट

पश्चिम बंगाल – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील सेरामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेमध्ये बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकांचा निकाल हा भाजपच्या बाजूने लागणार असल्याचे भाकीत देखील केले. ते म्हणाले, “दीदी, २३ मे रोजी जेव्हा लोकसभा निवडणुकांचा निकाल लागेल त्यावेळी सर्वत्र कमळ उमलेल. देशभरात कमळ उमलल्यावर तृणमूलचे आमदार दीदींना सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील. आज देखील तृणमूलचे ४० आमदार माझ्या संपर्कात आहेत.”

दरम्यान, १७वी लोकसभा स्थापन करण्यासाठी सध्या देशभरामध्ये लोकसभेच्या निवणुका सुरु असून आतापर्यंत एकूण ७ टप्प्यांपैकी ३ टप्प्यातील निवडणूका पार पडल्या आहेत तर आज ४थ्या टप्प्यासाठी मतदान सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या निवडणुका सातही टप्प्यांमध्ये घेण्यात येत असून पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजप यांच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरु आहे.

https://twitter.com/ANI/status/1122797092047663105

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)