भाजपच्या चाळीस टक्के खासदारांचा पत्ता होणार कट

वंदना बर्वे

नवी दिल्ली – भाजप जवळपास चाळीस टक्के खासदारांचे तिकीट कापणार असल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या नाराजीची कुऱ्हाड महाराष्ट्रातील खासदारांचे कोसळते की काय? अशी भीती निर्माण झाली आहे.

आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सत्ताधारी भाजप आता उमेदवारांची निवड करण्याच्या कामाला लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा जवळपास निम्म्या खासदारांच्या कामकाजावर नाराज आहेत. यातील किमान चाळीस टक्के खासदारांचा पत्ता कापला जाणार असल्याचे ऐकिवात आहे. याबाबत केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल.

पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल रोजी 91 जागांवर मतदान होणार आहे. यात महाराष्ट्राच्या विदर्भातील सात मतदारसंघाचा समावेश आहे. प्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी किमान एक महिना मिळावा, अशी पक्षाची भूमिका आहे. पाकिस्तावर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढली आहे. तरीसुध्दा, पक्ष कोणतीही जोखीम घेण्यास तयार नाही.

28 राज्यांपैकी 12 राज्यांत भाजपची आणि सहा ठिकाणी रालोआ आघाडीचे सरकार आहे. काही राज्यांमध्ये सरकारवर नाराजी आहे, तर काही नाराजी खासदारांवर आहे. भाजपने पक्षाच्या सर्व 272 खासदारांच्या कामकाजाची माहिती खासगी संस्थेकडून गोळा केली आहे. प्रत्येक मतदारसंघाचा सर्वे करताना जनता आणि पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)