40 लाख नागरिकांना “अन्नसुरक्षा’चा लाभ

योजनेचे लाभार्थी वाढणार : शासनाचे प्रशासनाला आदेश

पुणे – राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार राज्य शासनाने या योजनेतील लाभार्थींची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील 14 लाख 39 हजार 798, तर ग्रामीण भागातील 25 लाख 82 हजार 282 लाभार्थींना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

-Ads-

केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम-2013 पासून लागू केला आहे. यानुसार राज्यासाठी 76.32 टक्के नागरिकांना लाभ द्यायचा आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील व शहरी लाभार्थींची संख्या निश्‍चित करण्यात आली आहे. पात्र लाभार्थींची निवड करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात आले होते. राज्यात शिधापत्रिकांच्या संगणकीकरणाची मोहीम राबविताना शिधापत्रिका संगणकीकृत करण्यात आल्यामुळे त्यानुसार लाभार्थींची आकडेवारी विचारात घेऊन जिल्हानिहाय अद्ययावत उद्दिष्ट देण्यात आले. मात्र, आता राज्यातील हे उद्दिष्ट गाठण्यासाठी शासनाने अन्नसुरक्षेचे लाभार्थींची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी शासनाने कार्यपद्धती निश्‍चित केली आहे. सर्वप्रथम अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यात यावी. ही कार्यवाही करताना प्राधान्य कुटुंब लाभार्थींमधील शिधापत्रिकाधारकांमधून लाभार्थींची निवड करून अंत्योदय अन्न योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे. त्यानंतर उत्पन्न मर्यादेत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी. अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांतील सर्व सदस्यांचे आधार जोडणी झालेली नाही. ते पूर्ण करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी. अशा सूचना शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)