40 मावळत्या सदस्यांना निरोप न देताच राज्यसभा तहकुब

नवी दिल्ली – अद्रमुक आणि तेलगु देसम पक्षाच्या सदस्यांनी आजही राज्यसभेत गोंधळ चालूच ठेवल्याने आजही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब करण्याची वेळ आली. आज राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या चाळीस खासदारांना निरोप देण्यात येणार होता पण त्यासाठीही कामकाज सुरू ठेवण्यास आंदोलनकर्त्या सदस्यांनी नकार दिला.

कामकाज तहकुब करण्यास कॉंग्रेस सह, अन्य विरोधी सदस्यांचा विरोध होता. कामकाज दिवसभरासाठी तहकुब करण्यात आल्याची घोषणा अध्यक्षांनी केल्यानंतरही विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद सभागृहात बसून होते त्यांनी आपल्या पक्षाच्या अन्य सदस्यांनाहीं सभागृह सोडून न जाण्याची सुचना केली. त्यामुळे कामकाज तहकुब झाल्यानंतरही विरोधी पक्षाचे सदस्य सभागृहातच बसुन राहिल्याचे दृष्य आज पहायला मिळाले. त्यावेळी सभागृह नेते अरूण जेटली हे गुलामनबी आझाद आणि अन्य नेत्यांशी चर्चा करताना दिसून आले. त्यानंतर काही वेळाने सर्व सदस्य सभागृहातून निघून गेले.

तत्पुर्वी सकाळी कामकाज सुरू झाल्यानंतर टीडीपी आणि अद्रमुक पक्षाच्या सदस्यांचा गोंधळ सुरू झाल्याने अध्यक्ष व्यंकैय्या नायडू यांनी पहिल्यांदा पंधरा मिनीटांसाठी कामकाज तहकुब केले. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्याने त्यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकुब केले. अचानक दिवसभरासाठी कामकाज तहकुब करण्याच्या नायडू यांच्या निर्णयावर विरोधी सदस्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)