पैसे काढून देण्याच्या बहाण्याने 4 हजार लांबविले

नगर -एटीएमवर पैसे काढण्याच्या बहाण्याने शेजारी उभ्या असलेल्या इसमाने मशिनमधुन बाहेर आलेले 4 हजार रूपये चोरून नेल्याची घटना आनंदऋषीजी हॉस्पिटलसमोरी शहर सहकारी बॅंकेच्या एटीएमवर गुरूवारी (दि.20) दुपारच्या सुमारास घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मिलिंद चंद्रकांत गांधी (वय. 53, रा. उज्ज्वलनगर, माळीवाडा) हे एटीएममधून पैस काढण्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलसमोर असणाऱ्या शहर सहकारी बॅंकेच्या एटीएम केंद्रावर गेले. तेथे अगोदरच एक इसम उभा होता. गांधी यांच्याकडून एटीएम मशिनमधुन पैसे निघाले नाही. तेव्हा तो इसम मी पैसे काढुन देतो, असे म्हणत गांधीकडून कार्ड घेवून पैसे काढले.

त्यानंतर गांधी यांची नजर चुकवून त्या माणसाने तेथून पळ काढला. याप्रकरणी कोतवाली पोलीसांनी मिलिंद गांधी यांच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली

Leave A Reply

Your email address will not be published.