पहिल्या सहा महिन्यांत सरकार घेणार 4.42 लाख कोटींचे कर्ज

गेल्या वर्षापेक्षा सरकारच्या कर्जाचा आकडा वाढणार

नवी दिल्ली – आर्थिक वर्ष 2019- 20 च्या पहिल्या सहा महिन्यात केंद्र सरकार 4.42 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेणार असल्याचे आर्थिक व्यवहार सचिव सुभाष चंद्र ग्रर्ग यांनी सांगितले.

केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात 2019-20 या आर्थिक वर्षात 7.1 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा इरादा जाहीर केलेला आहे. त्यापैकी 4.42 लाख कोटी रुपयांचे पहिल्या सहा महिन्यांत घेतले जाईल. याचा अर्थ पुढील प्रत्येक आठवड्याला केंद्र सरकार सतराशे कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे.

त्यानंतर उरलेल्या सहा महिन्यांत 3.40 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेणे अपेक्षित आहे असे गर्ग यांनी सांगितले. या आर्थिक वर्षात सरकारची वित्तीय तूट 3.4 टक्के राहील, असा विश्वास गर्ग यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी घेतलेल्या कर्जाचे व्याज द्यावे लागणार असल्यामुळे ही सरकारला कर्ज घेण्यात वाढ करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या वर्षी सरकारने जेवढे कर्ज घेतले होते त्यापेक्षा या वर्षी काही प्रमाणात अधिक कर्ज घ्यावे लागणार असल्याचे कर्जाच्या आकडेवाडीवरून दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)