4 हजार 302 वाहनांवर कारवाई

पिंपरी – पिंपरी पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 4 हजार 302 वाहनांवर 23 दिवसात कारवाई केली आहे.

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिलेल्या आदेशानुसार, पिंपरी-चिंचवड शहरात बेशिस्त वाहन चालकावर चाप बसवण्यासाठी पोलीस यंत्रणाही सरसावली असून त्यानुसार शहरातल्या प्रत्येक मुख्य चौकात ही कारवाई केली जात आहे.

त्यानुसार 17 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या 23 दिवसाच्या कालावधीत पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबेडकर चौक, महावीर चौक, रसरंग चौक, खंडोबा माळ चौक, शिवाजी चौक, शगुन चौक, साई चौक, मोहननगर, भाटनगर, नेहरूनगर आदी ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 4 हजार 302 वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये “नो पार्किंग’, “रॉग साईड’, “नो एण्ट्री’, “ट्रिपल सीट’, “सिग्नल कटिंग’ करणाऱ्या वाहनांचा समावेश होता. पुढील कारवाई करिता या वाहनांची माहिती पिंपरी व चिंचवड वाहतूक विभाग यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती पिंपरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)