4 लाख 34 हजार बालकांचे लसीकरण

पिंपरी – राज्य शासनाच्या गोवर रुबेला लसीकरण मोहीम पिंपरी-चिंचवड महापलिकेच्या वैद्यकिय विभागांतर्फे राबविण्यात येत आहे. सध्या शहरात 1200 ठिकाणी मोहीम सुरु असून या मोहिमेतंर्गत सहा लाख सोळा हजार एकशे त्र्याण्णव एवढे उद्दिष्ट आहे. यापैकी, चार लाख चौतीस हजार दोनशे चौतीस एवढे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती, आरोग्य विभागाने दिली आहे.

गोवर रुबेला लसीकरण मोहिम 27 नोव्हेंबर 2018 पासून राबविण्यात येत आहे. गोवर रुबेला लसीकरण मोहिमेत लाभार्थी 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व बालके व विद्यार्थी येतात. या वयोगटातील जास्तीत जास्त बालक व विद्यार्थ्यांपर्यत सर्व महापालिका व खासगी शाळा, अंगणवाडी, बालवाडी, नर्सरी, प्ले ग्रुप मार्फत मोहिमेपर्यत पोहचणे शक्‍य होत आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मनपा व खासगी शाळांमध्ये लसीकरण मोहीम सुरु आहे. राज्य शासनाच्या मोहिमेत महापालिकेस लसीकरण उद्दिष्ट्य पुर्ण करण्यासाठी आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे विविध विभाग, वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग, रोटरी क्‍लब, लायन्स क्‍लब, इंडियन मेडिकल असोशिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन, पिंपरी चिंचवड डॉक्‍टर असोसिएशन, खासगी बालरोगतज्ज्ञ, पिंपरी-चिंचवड मुस्लिम विकास परिषद, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, अंगणवाडी सेविका आदींचे सहकार्य मिळत आहे. तसेच, सार्वजनिक आरोग्यामध्ये गोवर लसीकरण हे एक प्रभावी साधन ठरले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या मोहिमेत ज्या बालकांचे गोवर रुबेला लसीकरण राहिलेले आहे त्यांनी महापालिकेच्या रुग्णालये अथवा बाह्यसंपर्क सत्रांच्या ठिकाणी लसीकरण करुन घ्यावे व मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे. या मोहिमेसाठी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांचे अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समितीची सभा आयोजित केली होती. यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ. तृप्ती सांगळे, शिक्षणाधिकारी पराग मुंढे, प्रभारी वैद्यकिय अधिकारी रुग्णालय डॉ. शैलजा भावसार, डॉ. एस. एम. शिंदे, डॉ. पी. एच. ताडे, डॉ. संगिता तिरुमणी, डॉ. विणादेवी गंभीर, डॉ. सुनिता इंजिनिअर, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. बिपीन डिंबळे आदी उपस्थित होते.

लसीकरणासाठी महापालिकेचे आवाहन
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व सरकारी व खासगी शाळांमध्ये लसीकरण मोहीम सुरु आहे. महापालिकेची रुग्णालयांमध्ये गोबर रुबेला लसीकरणासाठी विशेष बुथ स्थापन करण्यात आलेले आहेत. तसेच, महापालिका कार्यक्षेत्रातील अंगणवाडी, बालवाडी, बांधकामे, विटभट्टया आदी ठिकाणी बाह्यसंपर्क सत्रे आयोजित करण्यात आलेली असून या बाबतची माहिती महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. लसीकरण केंद्रांवर बालकांचे लसीकरण करण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)