चीनमध्ये 50 हजारांपेक्षा अधिक ‘3डी स्क्रीन’वर प्रदर्शित होणार रजनीकांतचा ‘2.0’

सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा काही दिवसापूर्वीच प्रदर्शित झालेला ‘2.0’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. आता हा चित्रपट चीनमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.  चित्रपटाच्या निर्मात्यांनी याविषयीची माहिती दिली आहे.

लायका प्रोडक्शनने या विषयी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली. लायका प्रोडक्शनने ट्विटरवर ट्विट करत म्हटलं आहे की, चीनमधील 47000 पेक्षा अधिक 3डी स्क्रीनवर 2.0 प्रदर्शित होण्यास तयार आहे. मे 2019 मध्ये हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित केला जाईल.

-Ads-

दोन आठवड्यातच 500 कोटींची कमाई 

विदेशी भाषेमध्ये 3डी मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होणारा 2.0 हा पहिलाच चित्रपट आहे. याच बरोबर या चित्रपटाने पहिल्या दोन आठवड्यातच 500 कोटींची कमाई केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)