जाणून घ्या! थ्रीडी पेल्विक फ्लोर इमेजिंगबद्दल

डॉ. अश्‍विन पोरवाल 

पुण्यामध्ये आता थ्रीडी पेल्विक फ्लोर इमेजिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एमआरआयचा वापर न करताच कॉम्प्लेक्‍स फिस्तुला यासारख्या गुंतागुंतीच्या आजारांचे अचूक आणि कमी वेळेत निदान करणे आता शक्‍य झाले आहे.

जगभरात काही निवडक ठिकाणीच ही सुविधा उपलब्ध आहे. रेक्‍टल कॅन्सरचे अचूक निदान आणि शस्त्रक्रियेसाठी आवश्‍यक असलेल्या रुग्णाच्या शरीराच्या विशिष्ट भागाच्या स्पष्ट प्रतिमा मिळविण्यासाठी थ्री-डी पेल्विक फ्लोर इमेजिंगचा फायदा होतो.
जगभरातील निवडक ठिकाणीच अशी सुविधा उपलब्ध आहे. सुमारे 20 ते 30 टक्के रुग्णांना एमआरआय करताना भीती वाटत असते. अशा रुग्णांच्या आजाराच्या निदानासाठी, स्क्रीनिंगसाठी तसेच डेफेकोग्राफीसाठी ही सुविधा उपयुक्‍त आहे. थ्रीडी पेल्विक फ्लोर इमेजिंग सुविधा ही रुग्णांच्या दृष्टीने अत्यंत सोयीची आहे. त्यासाठी फक्त 15 मिनिटांचा वेळ लागतो.
कॉम्प्लेक्‍स फिस्तुला, स्फिंक्‍टर डिफेक्‍टचे निदान, रेक्‍टल कॅन्सरचे निदान, इन्कॉन्टिनंसची शस्त्रक्रिया, फिस्तुला रिपेअर आणि सातत्याने होणाऱ्या बद्धकोष्ठतेच्या निदानासाठी थ्रीडी पेल्विक फ्लोर इमेजिंगचा वापर केला जातो.
नव्याने विकसित केलेल्या डीएलपीएल तंत्रज्ञान पुण्यामध्ये आल्याने यापूर्वीही अत्याधुनिक व नावीन्यपूर्ण उपचार, शस्त्रक्रियांचा फायदा रुग्णांना झाला आहे. मूळव्याध व बद्धकोष्ठतेसाठी एमसीडीपीए, वारंवार होणाऱ्या बद्धकोष्ठतेसाठी बायोफिडबॅक तसेच डिटॉक्‍स व कोलोन क्‍लिन्सिंगसाठी कोलोन हायड्रोथेरपीची सुविधाही आता पुण्यात उपलब्ध आहे.

-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)