397 थुंकीसम्राटांवर कारवाई!

44 हजार 50 रुपये दंड वसूल

पुणे – थुंकीबहाद्दरांनो आणि शहर अस्वच्छ करणाऱ्यांनो सावधान! महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तुमच्यावर नजर राहणार असून, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कारवाई होणार हे निश्‍चित झाले आहे. महापालिकेने 2 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत 397 थुंकीबहाद्दरांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून 44 हजार 50 रुपये दंड वसूल केला आहे. ही कारवाई 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत सुरूच राहणार आहे.

-Ads-

थुंकीबहाद्दूर, सार्वजनिक ठिकाणी शौच, लघुशंका करणे, कचरा टाकणे यावर जागेवर दंड आकारण्याला महापालिकेने सुरूवात केली आहे. त्यातून थुंकीबहाद्दरांना तर दंडाशिवाय स्वत:ची थुंकी पुसण्याचीही शिक्षा देऊन अद्दल घडवण्याचा प्रकार सुरू केला आहे. या “ड्राइव्ह’ मधून महापालिकेने 397 जणांकडून दंडवसुली केली असून त्यांच्याकडून 44 हजार 50 रुपये दंड वसूल केला आहे.

15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत हा “ड्राइव्ह’ सुरू करण्यात आला आहे. यामध्ये महापालिका आयुक्त ते कनिष्ठ अभियंता पर्यंतचे सर्व अधिकारी सकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत शहरातील 41 प्रभागांमध्ये फेरी मारून याबाबत पाहणी करणार असून, नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

प्रत्येक दिवशी 41 प्रभागात 41 अधिकारी आणि कर्मचारी असतील तसेच पुढच्या 15 दिवसांनी पुन्हा त्याच प्रभागात त्या अधिकाऱ्यांनी पाहणी करण्याचा नियम ठरवून देण्यात आला आहे.

या मोहीमेत महापालिकेतील सुमारे 700 अधिकारी आणि कर्मचारी पुढील 3 महिन्यांसाठी कार्यरत राहणार आहेत.
त्यानुसार अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी आणि विविध विभागप्रमुखांनी नेमून दिलेल्या प्रभागात सकाळी पाहणी केली. या “ड्राइव्ह’चा एक भाग थुंकण्यावर बंदी असल्याने त्याबाबत अधिकारी, कर्मचारी प्रचंड सक्रीय असल्याचे दिसून आले आहे.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाई
पाच परिमंडळातील 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत केलेल्या कारवाईत परिमंडळ-3 मध्ये सर्वाधिक थुंकीबहाद्दर असून, येथे 66 जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये औंध-बाणेर, शिवाजीनगर, कोथरूड-बावधन परिसर येतो. त्यानंतर परिमंडळ तीन मध्ये धनकवडी-सहकारनगर, सिंहगडरस्ता आणि वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 64 जणांवर कारवाई करण्यात आली. कसबा-विश्रामबाग, भवानीपेठ आणि बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 55 जणांवर, कोंढवा-येवलेवाडी, वानवडी-रामटेकडी, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 50; तर नगररस्ता, येरवडा आणि ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 35 जणांवर कारवाई करण्यात आली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)