389 प्राध्यापकांना मानधन वाढीचा लाभ

पुणे विभागात यंदापासून अडीच कोटी रुपये वितरीत करावे लागणार


मागील वर्षात मानधनापोटी 1 कोटी 24 लाख रुपये वितरीत

पुणे – राज्य शासनाने वरिष्ठ महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा लाभ पुणे विभागातील 389 प्राध्यापकांना मिळणार आहे. गतवर्षी पुणे विभागात तासिका तत्त्वावरील मानधनासाठी 1 कोटी 24 लाख रुपये प्राध्यापकांना देण्यात आले होते. त्यात यंदाच्या वर्षापासून दुपटीने मानधन प्राध्यापकांना द्यावे लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्य शासनाने पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांतील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या (अध्यापक) मानधनात दुप्पटीने वाढ केला आहे. पुणे विभागात अनुदानित 167 वरिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात प्राध्यापकांची भरतीच बंद असल्याने तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची निवड केली जाते. या प्राध्यापकांचा आधार घेत महाविद्यालयात अध्यापनाचा समतोल साधला जातो. आता या मानधनात वाढ केल्याने प्राध्यापकांना दिलासा मिळाला आहे.

-Ads-

नगर, नाशिक व पुणे कार्यक्षेत्र असलेल्या पुणे विभागात 389 प्राध्यापक तासिका तत्त्वावर अध्यापन करीत असल्याचे पुणे विभागीय उच्च शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. या प्राध्यापकांना मागील शैक्षणिक वर्षात मानधनापोटी 1 कोटी 24 लाख रुपये देण्यात आले. यंदा मात्र त्यात दुपटीने वाढ होणार आहे. म्हणजेच 2 कोटी 48 लाख रुपये आता मानधनासाठी पुणे विभागातील प्राध्यापकांना वितरित करावे लागणार आहेत.

चांगले दिवस येणार
कायम व तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे काम एकच आहे. मात्र, कायम असलेल्या प्राध्यापकांना 50 हजार ते लाखांच्या पुढे वेतन असते. त्यांच्यासोबत अध्यापन करणाऱ्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना महिनाकाठी 8 ते 10 हजारांच्या आत मानधन मिळायचे. त्यामुळे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची प्राथमिक गरजा पूर्ण करणे अशक्‍य बनले होते. आता मानधन दुपटीने होणार असल्याने या प्राध्यापकांचा 18 ते 20 हजार रुपये मानधन मिळणार आहे. आता या प्राध्यापकांना खऱ्या अर्थाने चांगले दिवस येण्याची चिन्हे आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)