38 लाखाच्या ऑनलाईन बॅंक फसवणुकीतील मास्टरमाईंड जेरबंद

सायबर क्राईमची कामगिरी :महाराष्ट्रातील दोन तर युपीतील एक गुन्हा उघड

सातारा-साताऱ्यातील एका कंपनीचा बॅंकेशी लिंक असणारा मोबाईल क्रमांक सीम स्वाईप करुन घेऊन कंपनीच्या बॅंक खात्यातील 37 लाख 78 हजार रुपये पंजाब, दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांतील विविध बॅंक खात्यामध्ये ट्रान्सफर करत ऑनलाईन लूट करणाऱ्या टोळीतीच्या मास्टमाईंडला सायबर क्राईंमच्या पोलिसांनी दिल्लीतून ताब्यात घेतले आहे. आत्तापर्यंत याप्रकरणात एकूण सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

-Ads-

दिलशान अहमद निसार (वय 35 रा.चांदपूर,उत्तरप्रदेश), सोनु सुनिल कुमार (वय 34 रा.चंदीगढ) संजय दिलबाग शर्मा (वय 52 रा.देहराडून,उत्तराखंड)इम्तीयाज अहमद (वय 40 रा.मुझफरपूर,बिहार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यापूर्वी याच टोळीतील अभिषेक सूनिल कुमार (वय 20, रा. झिरकपूर,मोहाली, पंजाब), यादविंदर नरेंद्र सिंग (वय 34, रा. झिरकपूर, मोहाली, पंजाब) दिलशाद अहमद (वय 35,रा.गजरोला, उत्तरप्रदेश) यांना सातारा पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने अटक केली आहे. मोळाचा ओढा येथील अभिजात इक्विपमेंट व अभिजात इंजिनिअर्स या कंपनी व्यवस्थापकाच्या मोबाईलचे सीमकार्ड स्वाईप करून कंपनीच्या आयडीबीआय बॅंकेच्या खात्यातील 38 लाखाच्या रकमेवर या ऑनलाईन चोरट्यांनी डल्ला मारला होता.

कंपनीच्या व्यवस्थापकाच्या मोबाईवर तुमचे सीमकार्ड अपडेट करण्यासाठी ऑर्डर देण्यात आली आहे. तुम्ही मागणी केली नसल्यास आणि सीम सुरू ठेवण्यासाठी 121 या क्रमांकावर तातडीने फोन करा, असा मेसेज आला होता. त्या मेसेजमध्ये काही अन्य क्रमांकही होते. सीम बंद व्हायला नको म्हणून मॅनेजरनी तातडीने 121 क्रमांकावर फोन केला व पुढील प्रक्रिया केली. ऑनलाईन भामट्यांनी त्या व्यवस्थापकाच्या सीमचा नंबर त्यांच्याकडील ब्लॅंक सीमवर कॉपी करून घेतला. त्यानंतर कंपनीच्या बॅंक खात्यातून 37 लाख 78 हजार रुपये लंपास केले होते.
याबाबत ऑगस्ट महिन्यात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर हा गुन्हा तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सायबर पोलिस ठाण्याकडे देण्यात आला. सायबरच्या मदतीने या गुन्ह्यातील माहितीचे तांत्रिक़ विश्‍लेषण बारकाईने केले.

तक्रारदार यांच्या बॅंक खात्यावरून आरोपींनी वेगवेगळ्या बॅंक खात्यावर एकाच दिवशी पैसे ट्रान्सफर केले होते. त्याच बॅंक खात्याची माहिती घेत सायबरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कदम व कर्मचाऱ्यांनी अल्पावधीत सर्व ठिकाणांची व संशयितांची माहिती संकलित केली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ पंजाब राज्यातील झिरकपूर,बिहार,उत्तरप्रदेशातील गजरोला या ठिकाणावरून तीन आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या होत्या. मात्र याप्रकरणाचा मुख्य सुत्रधार शोधण्याचे मोठे आव्हाण पोलिसांच्या पुढे होते. त्यानुसार जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांच्या सुचनेनुसार पो.नि.पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखली स.पो.नि. गजानन कदम , पो.हवा. शंकर सावंत, महेश शेटे, सविन पवार,तुषार साठे,अनिकेत जाधव,प्रवीण अहिरे,गणेश कचरे, एस.पी.जाधव, मारूती अडागळे,वर्षा खोचे, ज्योती कोंडावळे,यशोमती साळुंखे या कर्मचाऱ्यांनी अखेर डेहराडून येथून दोन आरोपी तर दिल्लीतून मुख्य आरोपीच्या मुसक्‍या आवळल्या. कोणाला बॅंकेतून बोलतो असे सांगत फोनवरून माहिती विचारली तर देऊ नका. चुकून आपल्या बॅंक खात्याची माहिती कोणाला दिली गेली, तर सायबर सेलशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

… तर ती कंपनी होईल आरोपी
ज्या मोबाईल ऑपरेटर कंपनीने साताऱ्यातील ग्राहकाचा मोबाईल नंबर बिहारमध्ये असलेल्या व्यक्तीला क्‍लोन करून दिला. त्यावेळी कंपनीने वस्तूस्थितीची खात्री करणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. जर तपासात कंपनीचा बेजबादारपणा आढळला,तर मोबाईल ऑपरेटर कंपनीवर कारवाई करण्याचे संकेत जिल्हा पोलिस प्रमुखांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

सातारा पोलिसांचा उत्तरप्रदेशात झेंडा
सातारा पोलिस हे महाराष्ट्रात नावाजलेले आहेत. कुख्यात गुंड डीडी सिंगचा खातमा ते वाई येथील संतोष पोळच्या आवळलेल्या मुसक्‍या यामुळे पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. मात्र सातारा पोलिसांनी ऑनलाईन फसवणुकीतील आरोपींना परराज्यात अटक करून त्यांच्याकडून लखनौ येथील सव्वा कोटी रुपयांची फसवणूक उघड केल्याने सातारा पोलिसांचा झेंडा उत्तरप्रदेशातही लागला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)