टोळक्‍याच्या हल्ल्यात पादचारी जखमी

पिंपरी – रस्ता ओलांडत असलेल्या दोन पादचाऱ्यांवर टोळक्‍याने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये दोन्ही पादचारी गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. 27) रात्री नऊच्या सुमारास पिंपळे गुरव येथील नेताजी नगरमध्ये घडली.
अक्षय केंगले (वय 18, रा. पिंपळे गुरव, पुणे) याने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अक्षय खुडे, आकाश गाडेकर, रितेश साठे, योगेश आणा, मनिषभाई, उऱ्या, दिग्विजय, कमलेश, मोजेस आणि अन्य पाचजण अशा एकूण 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय आणि त्याचा मित्र गणेश मोटे पिंपळे गुरव येथील नेताजी नगरमधील दिव्या ड्रायफ्रूटस व फरसाण दुकानासमोरून रविवारी रात्री नऊच्या सुमारास रस्त्याने पायी जात होते. अचानक काही दुचाकींवरून वरील 14 जण आले. योगेश आणि मानिषभाई यांनी ‘अक्षय आणि गणेश यांचा काटा काढायला सांगितले आहे’ असे म्हणत दोघांना धक्काबुक्की केली. त्यानंतर सर्वांनी मिळून दोघांना लाथाबुक्क्‌यांनी मारहाण केली. दोघांवर लोखंडी कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये अक्षय आणि गणेश गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)