पुणे : महापालिकेच्या अभियंत्याकडे खंडणी मागणारा जेरबंद

पुणे – महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याकडे खंडणी मागून कॉंक्रिटच्या रस्त्याचे बांधकाम थांबविण्यात आले. ही घटना सोमवारी वानवडी येथील तरवडे वस्ती येथे घडली. याप्रकरणी एकाला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.
सुनील दशरथ बनसोडे (31, रा. महंमदवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. फिर्यादी संदीप दीपके हे महापालिकेत कनिष्ठ अभियंता पदावर काम करतात.

महापालिकेच्यावतीने तरवडे वस्ती येथे कॉक्रीटचा रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. सोमवारी रात्री येथे राहणारा सुनील बनसोडे त्याच्या साथीदारासह हत्यारे घेऊन तेथे आला. त्याने फिर्यादी व कामगारांना तुम्ही येथे काम करायचे नाही, करायचे असेल तर मला पैसे द्या नाहीतर मी तुम्हाला काम करून देणार नाही असा दम भरला. यानंतर फिर्यादीकडे खंडणी स्वरुपात पैशाची मागणी केली. पैसे दिले नाहीत म्हणून त्यांच्यासह कामगारांवर दगडफेक करून सिमेंट कॉंक्रीट रस्त्यावर नाचून रस्त्याचे नुकसान केले. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनसोडेला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शेखर शिंदे तपास करत आहेत

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)