36 वर्षांनंतर झाली वर्गमित्रांची गळाभेट

न्यू इंग्लिश स्कूल, 1981 च्या बॅचचा स्नेहमिलन सोहळा

नगर – अ.ए.सो.च्या न्यू इंग्लिश स्कूलच्या 1981 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा मैत्री दिनाच्या निमित्ताने नुकताच पार पडला. तब्बल 36 वर्षांनंतर एकाच शाळेत शिकलेले हे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यानिमित्ताने प्रथमच एकत्र आले.

या स्नेहमिलन सोहळ्यास शाळेतील शिक्षक पी. पी. कुलकर्णी, पी. आर. व मंगला कुलकर्णी, तांदुळवाडकर, लांडगे, ओहोळ, संजीवनी कुलकर्णी, कांबळे या उपस्थित होत्या.
याप्रसंगी शिक्षकांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, सरस्वती प्रार्थनेने वर्गाची सुरुवात झाली. मंगला कुलकर्णी यांनी आई-वडिलांप्रती आदर, प्रेमाची भावना निर्माण करणारी आणि आई- वडिलांच्या ऋणातून उतराई होण्यास प्रेरणा देणारी कविता सादर करून मराठी विषयाचा तास घेतला. त्याचप्रमाणे उपस्थित शिक्षकांनीही वयाच्या या वळणावर सुमारे 36 वर्षांनंतर एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांना आयुष्याचे धडे दिले.

रेषाकिरणांप्रमाणे अनंत असणाऱ्या या संसारात आपण रेखाबिंदूप्रमाणे छोटे असून, अनंत आणि विशाल अशा जगात आनंदी जीवन जगण्यासाठी पद-प्रतिष्ठेचा अहंकार सोडून वावरण्याचा सल्ला लांडगे यांनी दिला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे आम्हाला जीवन जगण्यासाठी पुन्हा एकदा उत्साह आणि प्रेरणा मिळाल्याची भावना पी. पी. कुलकर्णी, पी. आर.कुलकर्णी, ओहोळ, संजीवनी कुलकर्णी, कांबळे, तांदुळवाडकर, आदींनी व्यक्‍त केली. यावेळी गुरुजनांचे पाद्यपूजन करण्यात आले, तसेच विविध सामाजिक उपक्रम घेण्याचे ठरविण्यात आले. हा स्नेहमिलन सोहळा यशस्वी होण्यासाठी आयुर्विमा अधिकारी राजेंद्र साव, उद्योजक दर्शन सोनी, सुनील आकडे, अर्बन बॅंकेचे संचालक अजय बोरा, उद्योजक मेहुल भंडारी, राजेंद्र सांगळे, रवींद्र शिंदे, आदींनी परिश्रम घेतले.
राजेंद्र सांगळे यांनी सूत्रसंचलन केले व अजय बोरा यांनी आभार मानले. कार्यक्रमास अर्बन बॅंकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी, शिंगवी ज्वेलर्सचे संजय शिंगवी व नितीन शिंगवी, उद्योजक संजय जोशी, दर्शन सोनी, उद्योजक मेहुल भंडारी, ओमप्रकाश बायड, अजय झिंजे, विलास गांधी, संजय जामगावकर, पित्रोडा केशव, कमलेश गांधी, बाळासाहेब दशरथ, महापालिका अधिकारी कैलास भोसले, जितेंद्र सारसर, शासकीय अधिकारी राजेश इवळे, माणिक वाघ, माजी नगरसेवक सय्यद सादीक, बांधकाम व्यावसायिक सय्यद इकबाल, तसेच महेश पोतदार, सतीश मोढवे, दिलीप मोढवे, गणेश कंडेपल्ली, विजय काकडे, मनोज सुगंधी, प्रशांत कोळपकर, नागेश भागवत, दत्तात्रेय कोटकर, सुनील मुलसौंदर, दीपक सिकची, स्वामी, प्रकाश खंडेलवाल, प्रवीण रणखांब, आदी वर्गमित्र उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)