सातारा : जिल्हा न्यायालयात मनोरूग्णाचा धुडगुस

काचा फोडल्याने काही काळ न्यायालयात गोंधळ

येरवडा (पुणे) येथील मनोरूग्णालयात दाखल करण्यासाठी आवश्‍यक असणारी परवानगी घेण्यासाठी न्यायालयात आणलेल्या मनोरूग्णाने धुडगुस घालत न्यायालयातील काचा फोडल्याने काही काळ न्यायालयात गोंधळ उडाला होता.
दादा कोंडीबा दडस (वय 38) रा. लिंब ता. सातारा याने सोमवार दि.14 मे रोजी जिल्हाधिकारी यांची खुर्ची मला द्या म्हणजे त्यातून आलेल्या पैशातून मी माझ्यावर झालेले कर्ज फेडतो, असे म्हणत जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर दगड फेकल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला होता. दरम्यान माणुसकीचा विचार करत पोलिसांनी त्याला सातारा शहरातील मनोरुग्णासांठी काम करत असलेल्या यशोधन या संस्थेच्या ताब्यात देत संभाळण्याची विनंती केली होती. परंतु, दडस याचे मानसिक स्वास्थ्य जास्तच बिघडल्याने त्याला येरवडा येथील मनोरूग्णालयात दाखल करण्याचा निर्णय यशोधन संस्थेने घेतला होता. त्यानुसार पुणे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करत तो मनोरूग्ण असल्याचा दिलेला अहवाल घेऊन यशोधन”चे रवी बोडके व पोलिस कर्मचाऱ्यांनी न्यायालयाची परवानगी मिळावी यासाठी दडस याला न्यायालयात नेला होता. दडस याचे मानसिक संतुलन जास्तच बिघडल्याने त्याने न्यायालयातील चौकशी कक्षाच्या काचा हाताने फोडल्याने न्यायालयात गोधंळ उडाला होता. या फोडाफोडीत दडस याच्या हाताला जखम झाली असून त्याच्या उजव्या हाताचे एक बोट तुटल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)