पुणे – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. या मतदारसंघातून 249 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त होणार आहे. परंतु, दुपारी उन्ह्याच्या कडाक्याने मतदान केंद्रावरील गर्दी ओसरलेली पाहायला मिळत आहे. तरीही राज्यात 1 वाजेपर्यंत 35.70 टक्के मतदान झाले.
राज्यभरातील मतदानाची आकडेवारी
जळगाव – 33.12
रावेर – 35.15
जालना – 37.91
औरंगाबाद – 35.42
रायगड – 38.74
पुणे – 27.17
बारामती – 35.58
अहमदनगर – 34.73
माढा – 33.41
सांगली – 34.56
सातारा – 34.84
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 39.93
कोल्हापूर – 42.04
हातकणंगले- 39.68