35 मोबाइल टॉवर मिळकती सील

संग्रहित छायाचित्र

महापालिकेची कारवाई : मिळकतकर थकविणे भोवले

पुणे – मिळकतकर थकविल्याप्रकरणी दि.1 ते 18 जानेवारी या कालवाधीत 35 मोबाइल टॉवर उभारण्यात आलेल्या मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

मिळकतकराची थकबाकी मोठी असल्याने महापालिका प्रशासनाने शहरात विशेष वसुली मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच नवीन वर्षात या वसूली मोहिमेअंतर्गत सुमारे 17 कोटी 68 लाख रूपयांची वसुलीही करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मिळककर विभागास 2018-19 च्या अंदाजपत्रकात सुमारे 1,800 कोटी रूपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, आता पर्यंत 986 कोटी रुपयांची वसुली झाली असून 31 मार्च 2019 पर्यंत जास्तीत जास्त वसुलीचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासनास दिले आहेत. त्या अनुषंगाने या वसुलीसाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. या विशेष मिळकतरकर वसुली पथकाने 35 मोबाइल टॉवर उभारलेल्या मिळकतींसह, शहरातील इतर 15 मिळकती सील केल्या असून त्यातील 4 मिळकतधारकांनी 27 लाख रुपयांचा मिळकतकर महापालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. प्रशासन अधिकारी श्‍याम तारू आणि गिरीश पत्की यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)