ब्राझीलमध्ये खाणीतील धरण फुटून 34 ठार 300 बेपत्ता

रिओ डी जानिरो (ब्राझील) : दक्षिण-पूर्व ब्राझीलमधील एक धरण फुटल्याने किमान 34 जण मरण पावल्याची आणि 300 पेक्षा अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ब्राझीलमधील सर्वात मोठी लोह खनिज खाण “व्हेल’ मध्ये ही दुर्घटना घडली आहे. स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी रात्री 1.00 व्हेल खाणीतील धरण फुटले आणि त्यातील सुमारे 12 दशलक्ष घन मीटर्स चिखल बाहेर पडला. त्याने खालच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या धरणालाही पूर आला. चिखलाची ही नदी वाटेत जे आले त्याचा विध्वंस करत गेली. या पुरामुळे एक पूलदेखील कोसळला. सदर धरण 1976 साली बांधलेले असून गेले साडेतीन वर्षे मुळीच वापरात नव्हते .

जवळपासच्या भागातील घरे, वाहने, शेते नष्ट झाली या भागात मुख्यत: खाणीतील कामगार राहत होते.
धरण फुटल्याच्या कारणांचा पत्ता लागलेला नाही. धरण इतक्‍या झपाट्याने फुटले, की त्याची धोक्‍याची सूचना देणारी यंत्रणादेखील काही कार्य करू शकली नाही, असे व्हेल माईन्सचे अध्यक्ष फॅबियो श्‍वाटसमन यांनी सांगितले.
मदत कार्यासाठी हेलिकॉप्टर्स, हेवी मशीनरी आणि फायर फायटर्सचा वापर करण्यात येत आहे. 366 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र आता कोणी जिवंत आढळण्याची शक्‍यता अगदी कमी झाली असल्याचे सांगण्यात आहे आहे. एका स्थानिक वसतिगृहात राहणारे 252 कर्मचारी, ठेकेदार, निवासी आणि पाहुणे यांचा काही तपास लागलेला नाही. कामगारांना घेऊन जाणारी एक बस सापडली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पण त्यात किती जण होते याचा पत्ता लागलेला नाही. इतका जाड चिखलाचा थर झालेला आहे, की त्या खाली असलेले मृतदेह शोधून काढणे हे महाकठीण काम झाल्याचे फायर ब्रिगेडने सांगितले.

ब्राझीलची पर्यवरण रक्षक संस्था इलबांनाला 250 ब्राझीलियन रियाल्स म्हणजे 66.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स दंड सुनावलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)