338 “खुशालचेंडू’ कर्मचारी आढळले

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयाबरोबरच क्षेत्रीय कार्यालय परिसरात प्रशासन विभागाच्या वतीने अचानकपणे राबविण्यात आलेल्या तपासनी मोहिमत एकूण 338 कर्मचारी दोषी आढळले आहेत. एकूण नऊ दिवसांत केलेल्या या मोहिमेत 103 विभागांची अचानकपणे तपासणी करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, याकरिता प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली 25 ते 28 सप्टेंबर तसेच 1 ते 8 ऑक्‍टोबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये कामाच्या वेळेत विनाकारण कॅन्टीनमध्ये जाणे, आयकार्ड न लावता कामावर येणे, कामाचे ठिकाण सोडून अन्यत्र रेंगाळणारे कर्मचारी आढळले. या सर्व कर्मचाऱ्यांच तत्काळ दखल घेत, विभाग प्रमुखांना या कर्मचाऱ्यांची यादी सोपविण्यात आली. तसेच, या सर्व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते.

या तपासणी मोहिमते नऊ दिवसांत एकूण 103 विभागांचे कर्मचाऱ्यांची अचानकपणे तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण 338 कर्मचारी दोषी आढळले. या तपासणी मोहिमेनंतर या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. या कर्मचाऱ्यांपैकी 25 जणांचे खुलासे समाधानकारक असल्याने, ते मान्य करण्यात आले आहत. तर 12 कर्मचाऱ्याना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर 21 कर्मचाऱ्यांना मेमो, 50 कर्मचाऱ्यांना समज, 58 कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

तपासणी मोहिमेत सातत्याची गरज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासन विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत आढळलेल्या दोषी कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, अद्यापही या कर्मचाऱ्यांवर फारसा परिणाम झाला नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी या कारवाईत सातत्य ठेवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)