पुणे : एकाच वेळी तीन मुलांचे सुधारगृहातून पलायन

पुणे : शिवाजीनगर येथील बाल सुधारगृहातून एकाच वेळी तीन मुले पळून गेली आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही घटना 17 एप्रिल रोजी घडली, तर त्यांच्या शोधासाठी प्रसिद्धीपत्रक तब्बल आठ दिवसांनी काढण्यात आले आहे.

अमितकुमार रामसजीवन चौहान (15, रा. सूरजपूर, छत्तीसगड), श्रीशा प्रकाश कुलकर्णी (17, रा. कैलास कृपा, औंधरोड जवळ, चिखलवाडी) व राहुल सुरेश उराव उर्फ राहुल शिवम (15, रा.लंका वाराणसी, उत्तरप्रदेश) अशी पळून गेलेल्या मुलांची नावे आहेत. यासंदर्भात बालसुधारगृह काळजीवाहक विश्‍वनाथ पवार यांनी फिर्याद दिली आहे. जिल्हा परीविक्षा आणि अनुसंधारण संघटना यांचे शिवाजीनगर येथे मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह आहे. यामध्ये 17 एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता बालगृहाची पाहणी करताना तिन्ही मुले दिसली नाहीत, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवल्याचे म्हटले आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील दोघांवर लैंगिक अत्याचार झाले होते. यामुळे तो पळून पुण्यात आला होता. पुण्यात त्या दोघांना ताब्यात घेतल्यावर बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. तर यासंदर्भातील गुन्हा दाखल करुन तो झिरो नंबरने संबंधित पोलीस ठाण्यात पाठवण्यात आला आहे.

सुरक्षा व्यवस्था टांगणीला
दरम्यान, या घटनेमुळे बालसुधारगृह व्यवस्थेवर पुन्हा प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. विविध गुन्ह्यातील अल्पवयीन मुले सातत्याने पळून जाण्याच्या घटना घडूनही शासनाकडून त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याचे घटनेतून पुन्हा समोर आले आहे.

बाल सुधारगृहात लैंगिक छळ
जुलै 2015 मध्ये या बालसुधारगृहातून दोन मुले पळाली होती. अवघ्या 8 ते 10 वर्षे वय असलेही ही दोन मुले एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सापडली होती. बालसुधारगृहात असलेली मोठी मुले त्यांच्याकडू अश्‍लिल चाळे करुन घेत होती. त्यांना बालसुधारगृहातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली होती. मात्र, त्यांनी दखल न घेतल्याने मुले भिंतीवरुन उडी मारुन पळाली होती. बालसुधारगृहात जवळपास 170 मुले आहेत. यातील बहुतांश गुन्हेगारी पार्शवभूमीची आहेत. तर येरवडा येथील जवाहरलाल नेहरू बाल सुधारगृहातून 2 डिसेंबर 2014 रोजी 5 तर पुन्हा 20 डिसेंबर रोजी 5 मुले पळाली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)