33 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा: इथोपियाचा धावपटू अटलाव डेबेड विजेता

पुणे : येथे झालेल्या 33 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत नेहमीप्रमाणे अफ्रिकन खेळाडूंचेच वर्चस्व पहायला मिळाले. इथोपियाचा धावपटू अटलाव डेबेड हा या स्पर्धेचा विजेता ठरला. त्याने 42 किलो मीटरची मुख्य फुल मॅरेथॉन स्पर्धा 2 तास 17 मिनिटे आणि 17 सेकंदात पुर्ण करत स्पर्धा जिंकली. या स्पर्धेमध्ये एकूण 15 हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यात 102 परदेशी स्पर्धकांचा समावेश होता. तर, महिला गटात पास्कालिआ चेपकोगीहिने फुल मॅरेथॉन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

डिसेंबर महिन्याच्या पाहिल्या रविवारी पुण्यात दरवर्षी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेचे 33 वे वर्ष होते. सारसबागेजवळील बाबुराव सणस मैदानापासून सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते या मॅरेथॉनला सुरुवात झाली. यावेळी राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, परालम्पिकमध्ये पाहिले सुवर्णपदक जिकणारे पद्मश्री मुरलीकांत पेटकर, मिलिटरी इंटेलिजन्स स्कुलचे कमांडंट लेफ्टनंट जनरल आर. के. बन्सीवाल उपस्थित होते. यावेळी विविध अंतरांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये फुल मॅरेथॉन (मुख्य) 42 किमी, हाफ मॅरेथॉन 21 किमी, 10 किमी, 5 किमी, व्हीलचेअर या अशा विविध अंतरगटांचा यात समावेश होता.

-Ads-

यावेळी स्पर्धेच्या फुल मॅरेथॉन प्रकारात इथिओपियाच्या अटलाव डेबेडने प्रथम क्रमांक पटकावला. तर, तेशोम गेटाचेवने 2 तास 18 मिनिटे आणि 7 मिनिटात स्पर्धा पुर्ण करताना दुसरा क्रमांक पटकावला. तर, बेकेला अबेले असेफाने 2 तास 18 मिनिटे आणि 38 सेकंदात स्पर्धा पुर्ण करत तिसरा क्रमांक पटकावला. तर हाफ मॅरेथॉनमध्ये वोल्डेगिओर्गिस मेकेनॉनने 21 किमी अंतराची हि स्पर्धा 1 तास 3 मिनिटे आणि 42 सेकंदात पुर्ण करत विजय मिळवला. यावेळी डेकेबे गड्डीसा तफाने 1 तास 4 मिनिट आंइ 15 सेकंदात हि स्पर्धा पुर्ण करत दुसरा तर उर्गा अबु केबेबेने हि स्पर्धा 1 तास 4 मिनिटे आणि तेविस सेकंदात पुर्ण करत तिसरा क्रमांक पटकावला.

तर, महिलांच्या गटात पास्कालिआ चेपकोगीहिने 42 किलो मीटरची मुख्य फुल मॅरेथॉन स्पर्धा 2 तास 50 मिनिटे आणि 27 सेकंदात पुर्ण करताना विजेतेपद मिळवले. यावेळी बेलेव असार मेकोन्नेनने हि स्पर्धा 2 तास 52 मिनिटे आनि 30 सेकंदात पुर्ण करत दुसरा क्रमांक पटकावला. तर, फेकेड सिमेगेन तिलाहुनने हि स्पर्धा 2 तास 53 मिनिट आणि 50 सेकंदात पुर्ण करत तिसरा क्रमांक मिळवला. तर, महिलांच्या हाफंऍरेथॉन स्पर्धेत डेगेफा डिबेबे गेझ्मुने 21 किलो मिटरची स्पर्धा 1 तास 19 मिनिट आणि 9 सेकंदात पुर्ण करत विजेतेपद मिळवले. यावेळी मोती वोयंशेटकोमाने हि स्पर्धा 1 तास 19 मिनिट आणि 11 सेकंदात पुर्ण करत दुसरा क्रमांक पटकावला. तर, दादी सिगे गडिसाने हि स्पर्धा 1 तास 20 मिनिटे आणि 2 सेकंदात पुर्ण करत तिसरा क्रमांक मिळवला.

तर, व्हिलचेअर प्रकारात अमोल बोरिवालेने 8 मिनिटे आणि 2 सेकंदात रेस पुर्ण करत पहिला क्रमांक पटकावला. तर, मनियाल पानसेने 8 मिनिटे आणि 4 सेकंदात स्पर्धा पुर्ण करत दुसरा क्रमांक पटकावला. तर, मोहम्मद फैझ आलमने 8 मिनिटे आणि 6 सेकंदात स्पर्धा पुर्ण करत तिसरा क्रमांक पतकावला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)