33 लाखांच्या फसवणुकप्रकरणी चार आरोपींना अटक

तळेगाव दाभाडे- आठ महिन्यांपासून ते (दि. 8 नोव्हेंबर) पर्यंत स्वस्तात सोन्याचे बिस्किटे देण्याचे आमिष दाखवून 33 लाखांची फसवणूक करुन विचारणा करण्यासाठी गेलेल्या फिर्यादी महिलेचा विनयभंग केलेल्या सहा आरोपींपैकी चार आरोपींना तळेगाव दाभाडे पोलिसांनी रविवारी (दि.18) सायंकाळी चर वाजता अटक केली. सोमवारी (दि.19) वडगाव मावळ न्यायालयात आरोपींना हजर करणार आहेत.

प्रकाश गोपाळ साळवे (वय 48), महेंद्र गोपाळ साळवे (वय 51), सिद्धार्थ महेंद्र साळवे (वय 22), आकाश प्रकाश साळवे (वय 22), अशी अटक केलेल्या अरोपींची नावे आहेत. तर तेजस प्रकाश साळवे व मीनाक्षी प्रकाश साळवे (सर्व रा. तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन जवळ, यशवंत नगर, तळेगाव दाभाडे ता. मावळ) हे आरोपी अद्यापही फरार आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश साळवे यांने फिर्यादी महिलेस मागील आठ महिन्यांपासून ते (दि.8 नोव्हेंबर 2018) पर्यंत वेळोवेळी स्वस्तात सोन्यांची बिस्किटे देऊन विश्‍वास संपादन केला. 33 लाख रुपये घेऊन सोन्याची बिस्किटे देतो,असे सांगून फसवणूक केली. फिर्यादी महिला ही सोन्याची बिस्किटे मागण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता, फिर्यादी महिलेला मारहाण व धमकी देऊन आरोपी प्रकाश साळवे, आकाश साळवे व तेजस साळवे यांनी फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय दळवी करत आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)