328 औषधांवर आरोग्य मंत्रालयाची बंदी

नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 328 औषधांच्या विक्री किंवा वितरणासाठी केल्या जाणाऱ्या उत्पादनावर बंदी घातली आहे. याशिवाय या औषधांचे उत्पादन करण्यासही निर्बंध घातले आहे. “फिक्‍स्ड डोस कॉम्बिनेशन’ या वर्गवारीअंतर्गत येणाऱ्या या औषधांवर तातडीने बंदी लागू होत असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनामध्ये म्हटले आहे. दोन किंवा अधिक औषधांच्या ठराविक प्रमाणामध्ये एकत्रित करून एकच प्रकारात तयार करणे म्हणजे “एफडीसी’ होय.

माणसाच्या वापरासाठी हानीकारक असलेल्या 349 “एफडीसी’ वर औषधे अधिनियम 1940 च्या कलम 26 अ नुसार 10 मार्च 2016 रोजी बंदी घातली गेली आहे. मात्र त्याला काही उत्पादकांनी विविध उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये दिलेल्या निकालानुसार “ड्रग टेक्‍निकल ऍडव्हाजरी बोर्ड’च्या तज्ञांचे एक पॅनेल तयार करण्यात आले होते. या 328 “एफडीसी’ औषधांचा उपचारातील वापरासाठीचे कोणतेही समर्थनीय कारण उपलब्ध नाही. तसेच ही औषधे मानवाला हानीकारक ठरू शकतील, असे या पॅनेलच्या अहवालामध्ये म्हटले आहे. त्यानुसार या औषधांच्या उत्पादनावर बंदी घातली गेली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)