सामाजिक न्याय विभागाच्या महामंडळांना 325 कोटींचे कर्ज

राज्य सरकारने घेतली हमी ः मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

मुंबई: सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ या चार महामंडळाना राष्ट्रीय महामंडळाकडून कर्ज स्वरुपात निधी मिळावा यासाठी राज्य सरकारने हमी देण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाने चारही महामंडळाना एनएसएफडीसीकडून एकूण 325 कोटींचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अलिकडेच झालेल्या बैठकीत सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या अधिपत्याखालील महामंडळांना राष्ट्रीय महामंडळाकडून कर्ज स्वरुपात निधी मिळण्यासाठी शासन हमी देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळास 70 कोटी, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळास 50 कोटी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास 70 कोटी आणि महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळास 135 कोटी या प्रमाणे शासन हमी देण्यात आली आहे.

या हमी शुल्काचा दर प्रतिशेकडा प्रतिवर्ष दोन रुपयांऐवजी 50 पैसे करण्यासही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे दिव्यांग, चर्मकार व्यावसायिक यासह वंचित, उपेक्षित घटकांच्या कर्जासाठी निधी उपलब्ध होणार असून सामाजिक न्यायासाठीच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीस यामुळे गती मिळणार आहे. यासोबतच या महामंडळांकडून विविध सामाजिक घटकांसाठी कर्ज वितरण केले जाते. त्यासही आता महत्त्वाची मदत होऊ शकणार असून 19 हजार 224 प्रस्ताव मार्गी लागणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)