अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची एमआयएमची मागणी,

  • सहाय्यक पोलीस आयुक्‍तांना दिले निवेदन

पिंपरी, (प्रतिनिधी)- पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी एमआयएम या राजकीय पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्‍त सतिश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक शहर आहे. येथे पोट भरण्यासाठी लाखो गरीब कष्टकरी कामगारांचे या शहराच्या विविध भागांत वास्तव्य आहे. हा वर्ग आपल्या तुंटपुंज्या कमाईने घर चालवितो. परंतु कमाईचा बराचसा भाग हा दारूमध्ये खर्च होतो. शहरातील 72 झोपडपट्यांमध्ये सर्रासपणे देशी दारू, हातभट्टी यांसारख्या मादक पदार्थांबरोबरच गुटखा यांची सर्रास विक्री होत आहे. झोपडपट्यांमध्ये झालेल्या मृत्यू अहवालामध्ये अल्कोहोलिक मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे पोलीस पंचनाम्यामध्ये दिसून येते.

शहर प्रवक्‍ते धम्मराज साळवे यांनी दिलेल्या निवेदनात आरोप करण्यात आला आहे की, अनेक देशी दारूची दुकाने पोलीस व राजकीय आशीर्वादाने सुरु आहेत. निवेदनात इशारा देण्यात आला आहे की, शहरातील बेकायदेशीर हातभट्टी व देशी दारू, वैध-अवैध दारू दुकाने बंद करावीत. अन्यथा एमआयएमचे आमदार इम्तियाझ जलील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)