31 हजार 820 केसेस; 71 लाख 22 हजार रूपये दंड!

गत वर्षातील कारवाई, कोल्हापूर परिक्षेत्रात सरस कामगिरी

सुधीर पाटील 
कराड, दि. 4 – येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेने गत वर्षात मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये 31 हजार 820 केसेस करून 71 लाख 22 हजार 100 रूपये एवढा विक्रमी दंड वसूल केला आहे. याद्वारे कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये कराड वाहतूक शाखेची कामगिरी सर्वोच्च ठरली असून विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केलेल्या मुल्यांकनातही वाहतूक शाखेने पाच जिल्ह्यांत अव्वल स्थान पटकावले. 2018 मधील कारवाईचा आढावा पाहता शहर वाहतूक नियंत्रण शाखेची कामगिरी कराड पोलीस उपविभागाच्या शिरपेचात तुरा रोवणारी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेत एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 40 वाहतूक कर्मचारी कार्यरत आहेत. मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये या शाखेने वाहतूक नियमांचा भंग करणार्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला. कारवाईत सातत्य ठेवत विक्रमी केसेस आणि दंडही वसूल केला. त्यामुळे नियम न पाळणार्या वाहनधारकांना वाहतूक शाखेच्या कारवाईची धास्ती वाटू लागली. केवळ दंड वसूल करून न थांबता मद्य प्राशन करून वाहन चालविणार्यांवर आणि वाहतुकस अडथळा ठरतील, अशा प्रकारे वाहने उभी करणार्यांवर कारवाई करून त्यांच्यावर कोर्टात खटले दाखल केले. याशिवाय उपप्रादेशिक परिवहन खात्याकडे चालक परवाना निलबंनाचे आणि उपअधीक्षकांकडे वाहन नोंदणी निलंबनाचेही प्रस्ताव पाठविले. या धडक कारवाईमुळे वाहनधारकांचे धाबे दणाणले.

नवखा अधिकारी, पण दमदार कारवाई…
सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड हे कराड शहर पोलीस ठाण्यात रूजू झाल्यानंतर त्यांच्याकडे वाहतूक शाखेचा चार्ज देण्यात आला. वास्तविक त्यांना वाहतूक शाखेच्या कामाचा आजवर अनुभव नव्हता. तरीही वरिष्ठांनी सोपविलेली जबाबदारी आव्हान म्हणून त्यांनी स्वीकारली आणि ती यशस्वीरित्या पेललीसुध्दा. नवखे असतानाही सपोनि गायकवाड यांनी स्वत:च्या कार्यक्षमतेची चुणूक दाखविली. त्यामुळे कराड उपविभागाचाही कोल्हापूर परिक्षेत्रात दबदबा वाढला.

पूर्वी शहर पोलीस ठाण्यात असलेली वाहतूक नियंत्रण शाखा आता बसस्थानकानजीकच्या प्रांत कार्यालयाच्या इमारतीत स्थलांतरीत झाली आहे. बसस्थानक परिसरातील गजबज आणि रात्री घडणार्‍या घटनांवर वॉच रहावा, म्हणून वाहतूक शाखेचे सपोनि संभाजीराव गायकवाड यांनी वरिष्ठांच्या संमतीने तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. यामुळे प्रांत कार्यालयाच्या आतील आणि बसस्थानकाच्या परिसरातील हालचाली कॅमेर्‍यात टिपल्या जात आहेत. कॅमेर्‍यांमुळे अलिकडे या परिसरातील बर्‍याच गुन्हेगारी घटनांना आळाही बसला आहे. सपोनि गायकवाड यांनी अत्याधुनिक यंत्रणेद्वारे वाहतूक शाखेचे काम अद्ययावत करून वाहतूक शाखेचा चेहरामोहरा बदलला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)