302 कोटी 78 लाखांचा मिळकत कर जमा

पिंपरी – शहरातील एकूण 2 लाख 45 हजार 650 मिळकतधारकांनी एकूण 302 कोटी 78 लाखांचा मिळकत कर 22 नोव्हेंबरपर्यंत जमा केला आहे. “अभय’ योजनेत ऑक्‍टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत 35 कोटी 28 लाख रूपये मिळकत कर भरणा झाला आहे.

मिळकतकर कार्यालयांखेरीज ऑनलाईन माध्यमातून 1 लाख 23 हजार 54 मिळकतधारकांनी 151 कोटी 28 लाख रूपयांचा भरणा केला आहे. मिळकतधारकांनी पालिकेच्या ऑनलाईन भरणा सुविधेद्वारे मिळकतकराचा भरणा करून चालू वर्षाचे सामान्यकरातील 30 जून अखेर 5 टक्के व 30 जूननंतर 2 टक्के सवलतीचा लाभ देण्यात आला आहे.

ज्या मिळकतधारकांनी आजपर्यंत त्याचे नवीन, वाढीव बांधकामाची करआकारणी करून घेतलेली नाही व ज्या मिळकतधारकांनी वापरात बदल केलेला आहे. अशा सर्व मिळकतधारकांनी आश्‍यक त्या कागपत्रासह संबंधित करसंकलन विभागीय कार्यालयात अर्ज सादर करावा. मिळकतकर आकारणीबाबत महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)