300 महिलांना दिले आरोग्यविषयी माहिती

मंचर- भोईरवाडी-राजेवाडी (ता. आंबेगाव) येथील महिलांना रक्तक्षय आजाराविषयीची माहिती साक्षरता वर्गाच्या माध्यमातून देण्यात आली. रोटरी क्‍लब, आदिम संस्था व शहीद राजगुरु ग्रंथालय यांच्या एकत्रित संयोजनातून 17 ठिकाणी साक्षरता वर्ग सुरु आहेत. या वर्गात सुमारे 300 महिला शिक्षण घेत आहेत. राष्ट्रीय जनवकालत अध्ययन केंद्र पुणे ही संस्था यासाठी सहकार्य करीत आहे.

नुकतेच भोईरवाडी व राजेवाडी येथील साक्षरता वर्गातील महिलांना रक्तक्षय या आजाराविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. अलोचना संस्थेच्या वंदना कुलकर्णी यांनी रक्तपांढरी आजाराची चित्रांच्या माध्यमातून सहज व सोप्या भाषेत माहिती दिली. रक्तक्षय आजाराची कारणे त्यावरील उपाय व दैनंदिन आयुष्यात हा आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती महिलांना दिली. कार्यक्रमाचे संयोजन सुनील पेकारी, गणेश काटळे, मीना भोईर, पुंडलिक असवले, दादू भोईर, उषा साळवे यांनी केले. याप्रसंगी आदिम संस्थेचे डॉ. अमोल वाघमारे व माजी सरपंच अशोक पेकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)