300 कोटी द्या, अन्यथा गाडीला आडवे पडू ; प्रहार जनशक्तीचा भाजपला इशारा

खासदार रावसाहेब दानवे आज नगर दौऱ्यावर

नगर: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी नगर विकासासाठी शब्द दिल्याप्रमाणे 300 कोटी रुपये वर्ग करावेत. आश्‍वासनाची पूर्ती करावी. अन्यथा दानवे यांच्या गाडीसमोर आडवे पडू, असा इशारा प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी यांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खासदार रावसाहेब दानवे यांनी महापालिका निवडणुकीत भाजपच्या प्रचार सभेत महापौरपद द्या, शहर विकासासाठी 300 कोटी रुपये देऊ, अशी घोषणा केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि बहुजन समाज पक्षाच्या पाठिंब्यावर भाजपने महापौर व उपमहापौरपद मिळविले आहे. महापालिकेत भाजपची संपूर्ण सत्ता आली आहे. त्यानुसार रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता करण्याची वेळ आल्याकडे प्रहार जनशक्तीने लक्ष वेधले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे शुक्रवारी (आज) नगर दौऱ्यावर येत आहे. दीक्षित मंगल कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठक होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेशी युतीचा निर्णय रखडलेला असल्यामुळे स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शिर्डी व नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी खासदार दानवे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. दानवे नगर दौऱ्यात दोन्ही मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांच्या नावावर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते. दरम्यान, नगर महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ घेवून भाजपने सत्ता मिळविली आहे. या मुद्यावर राज्यभरात शिवसेना व भाजपच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. या पाश्‍वर्भूमीवर दानवे काय बोलतात, याकडेही लक्ष लागले आहे. त्यातच प्रहार जनशक्तीने 300 कोटींचा मुद्दा उचलून धरला आहे. यामुळे राजकीय वाद चिघळण्याची शक्‍यता आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)