300 अनधिकृत फलक काढण्यासाठी दीड कोटी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात केलेल्या सर्व्हेक्षणात आतापर्यंत एकूण 300 अनधिकृत फलक आढळले आहेत. त्यासाठी एक कोटींचा ठेका यापूर्वीच दिला आहे. मात्र, सर्व्हेक्षणानंतर आढळलेल्या 300 फलक हटविण्यासाठी येणाऱ्या आणखी 50 लाख रुपयांच्या वाढीव खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली. सोमवारी (दि. 5) पार पडलेल्या स्थायी सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

दीड महिन्यांपूर्वी पुण्यातील जुना बाजार येथील रेल्वेच्या हद्दीतील जाहिरात फलक कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत फलकाचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. शहरातील सर्व अनधिकृत फलक हटविण्याची मागणी नगरसेवकांनी उचलून धरली होती. लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत फलकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यामध्ये संपूर्ण शहरात केवळ 300 अनधिकृत फलक आढळले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने शहरातील अनधिकृत फलक काढण्यासाठी 2017-18 मध्ये दोन वर्षे कालावधीचा एक कोटी रुपयांचा ठेका मेसर्स गणेश एंटरप्रायजेस या ठेकेदाराला दिला आहे. मात्र, नव्याने केलेल्या सर्व्हेक्षणात 300 अनधिकृत फलक आढळले आहेत. मात्र, अनधिकृत फलकांची संख्या वाढल्याने हे फलक काढण्याच्या खर्चामध्ये देखील वाढ झाली आहे.

आकाशचिन्ह व परवाना विभागासाठी 2018-19 या आर्थिक वर्षात जाहिरात फलक काढणे तथा संबंधित खर्च या लेखाशिर्षावर दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत 20 लाख 15 हजार रुपये खर्च झाला असून, अद्यापही 1 कोटी 29 लाख 85 हजार एवढी रक्कम शिल्लक आहे. त्यामुळे हे अनधिकृत फलक काढण्यासाठी येणाऱ्या 50 लाख रुपयांच्या ऐनवेळच्या खर्चाच्या प्रस्तावाला स्थायीने मान्यता दिली आहे.

शहराच्या सर्वच भागांत अनधिकृत फलकांची संख्या कमी तर अनधिकृत फलकांची संख्या जास्त आहे. एका फलकाच्या परवान्यावर दोन -तीन फलक उभारले जातात. महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे प्रकार सुरू आहेत. महापालिका हद्दीत केवळ 300 अनधिकृत फलक नसून, ही संख्या अनेक पटींनी जास्त आहे. त्यामुळे महापालिकेने या फलकांचे फेरसर्व्हेक्षण करावे.
– दत्ता साने, विरोधी पक्षनेते, पिंपरी-चिंचवड महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)