३० सीरियन नागरिकांनी गमावला जीव

संग्रहित छायाचित्र

बेरुत : उत्तर सीरियाच्या इदलीबभागात अति बॉम्बहल्ले झाल्याने जवळजवळ ३0 सीरियन नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. मागील महिन्यापासून काही बंडखोर कट्टरपंथीय तेथे वास्तव्यास आहेत.

उत्तर सीरियाच्या इदलीब भागात हवाई हल्ले आणि  बॅरेल बॉम्ब टाकण्यात आले. तरीदेखील त्या प्रदेशातील मोठ्या भागावर आणखीही बंडखोरांचा ताबा आहे. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असद यांनी त्या भागळतील बंडखोरांना चेतावणी देत तो भाग लक्ष्य असल्याचे बजावले आहे.
ऑब्सरव्हेटरी मुख्य, रमी अब्देल रेहमान यांनी आज सांगितले की,”  इदलीबच्या दक्षिण भागात  रशियन लढाऊ विमानाच्या मार्फत हल्ले आणि सिरियन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बॅरेल बॉम्ब टाकण्यात आले आहेत. “
एएफपी शी बोलताना ते पुढे म्हणाले की, “इदलीबला डी-एस्कलेशन झोन घोषित केल्यानंतरपासूनचे हे सर्वात भीषण हल्ले होते . ”


-Ads-

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)