नगर: शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 30 उमेदवारांनी 44 उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. आज शेवटच्या दिवशी तब्बल 20 जणांनी 22 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे दिली.
शिर्डीसाठी शिवसेनेकडून खा. सदाशिव लोखंडे, कॉंग्रेसतर्फे आमदार भाऊसाहेब कांबळे, तर अपक्ष म्हणून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह 10 जणांनी उमेदवारी अर्ज सोमवारपर्यंत दाखल केले होते. आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 20 जणांनी अर्ज दाखल केले. त्यात संपत समिंदर (अपक्ष 2 अर्ज), गोविंद अमोलिक (अपक्ष 1 अर्ज), अंबादास सरोदे (अपक्ष 1 अर्ज), सचिन गवांडे (अपक्ष 1 अर्ज), अशोक जाधव (राष्ट्रीय मराठा पार्टी 1 अर्ज), जयंतकुमार आहेर (अपक्ष 1 अर्ज), प्रकाश वाघमारे (अपक्ष 1 अर्ज), सुरेश जगधने (बहुजन समाज पार्टी 1 अर्ज), अशोक वाकचौरे (अपक्ष 1 अर्ज), किशोर रोकडे (अपक्ष 1 अर्ज), बापू रणधीर (अपक्ष 2 अर्ज), भाऊसाहेब वाकचौरे (अपक्ष 1अर्ज), सुभाष त्रिभुवन (अपक्ष 1 अर्ज), प्रदिप सरोदे (अपक्ष 1 अर्ज), राजेंद्र वाघमारे (अपक्ष 1अर्ज), भूमिका बागुल (अपक्ष 1 अर्ज), विजय घाटे (रिपब्लिकन बहुजन सेना 1 अर्ज), शंकर बोरगे (अपक्ष 1 अर्ज), संजय सुखदान (वंचित बहुजन आघाडी 1 अर्ज), संतोष गायकवाड (अपक्ष 1 अर्ज) दाखल केले असल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली.